शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

तळागाळातील कार्यकर्ता मातोश्रीसोबत; तालुकाप्रमुख कोणाच्या पाठीशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST

शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने अशा घटना नवीन नसल्याचे बोलले जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली. शिवाय आम्हीच खरी शिवसेना, असा दावा केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीने मंगळवारी बैठक घेऊन बंडखोरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. आम्हीच खरी शिवसेना असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे त्यांनी जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याने राज्यातील राजकारणात वादळ उठले. त्यामुळे जिल्हा व तालुकास्थळावरील कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की, बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा प्रश्न निर्माण झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील कौल जाणून घेतले असता तळागाळातील कार्यकर्ता व तालुकाप्रमुखही मातोश्रीसोबत असल्याचा दावा केला आहे.शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने अशा घटना नवीन नसल्याचे बोलले जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली. शिवाय आम्हीच खरी शिवसेना, असा दावा केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीने मंगळवारी बैठक घेऊन बंडखोरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. आम्हीच खरी शिवसेना असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी शिवसैनिक सभा बैठका घेत आहेत. चंद्रपुरातही बैठक घेऊन बंडखोर आमदारांविरूद्ध निदर्शने करण्यात आली. तालुक्यातील सभा घेतल्या जात आहेत.

जिल्हाप्रमुख उद्धव यांच्यासोबत

चंद्रपूर जिल्हा शिवसेनाप्रमुख संदीप गिरे यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबत असल्याचे जाहीर केले. बंडखोर हे बेइमान आहेत. त्यांना शिवसैनिक धडा शिकवतील, असा दावाही त्यांनी केला.

सर्वच तालुकाप्रमुखांचा ठाकरेंना पाठिंबाचंद्रपूर, पोंभुर्णा, मूल, सावली, गोंडपिपरी, राजुरा, जिवती, कोरपणा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, भद्रावती तालुकाप्रमुखांचाही उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा दर्शविला आहे. बंडखोर येतात आणि जातात, पक्षाची संघटनशक्ती संपणारी नाही. आम्ही मातोश्रीसोबतच आहोत, असा दावा केला आहे.

शिंदेंशी संबंधच नसल्याचा दावाnबाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी द्रोह करून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाशी शिवसैनिकांचा संबंध नाही. जे पक्षातून बाहेर गेले ते बेइमान आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुकाप्रमुख मातोश्रीसोबतच राहणार, असा ठराव बैठकीत घेण्यात आला.

 कोण कोणाच्या पाठिशी? 

अनेक वर्षांपासून आम्ही शिवसेनेसोबत आहोत. उद्धव ठाकरे यांना आम्ही कदापि सोडून जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा त्याग आम्ही विसरणार नाही. -विनोद ऊर्फ शिक्की यादव, उपजिल्हाप्रमुख, बल्लारपूर 

उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे आम्ही तालुक्यात शिवसेना वाढवली. बंडखोरांनी स्वार्थासाठी इतरांशी हातमिळवणी केली. चिमूर तालुक्यातील शिवसैनिक मातोश्रीसोबत आहेत.-श्रीहरी सातपुते, तालुकाप्रमुख, चिमूर 

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे मातोश्रीसोबतच आहोत. शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर निघाले ते शिवसैनिक नाहीत.-पिंटू मेश्राम, तालुकाप्रमुख शिवसेना, वरोरा 

नागभीड तालुक्यातील कोणताही शिवसैनिक बंडखोरांसोबत नाही. त्यांनी पक्षाशी बेइमानी केली. आम्ही कोणत्याही संकटात मातोश्रीलाच सहकार्य करू.-मनोज लडके, तालुका उपप्रमुख, नागभीड 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे