विंजासन बुद्ध लेणी परिसर होणार सुशोभीत
By Admin | Updated: February 20, 2017 00:29 IST2017-02-20T00:29:52+5:302017-02-20T00:29:52+5:30
प्रादेशिक पर्यटन निधीतंर्गत विंजासन बुद्धलेणी परिसरातील विकासात्मक कामाला लागणारा निधी शासनाकडून भद्रावती न.प.ला प्राप्त झाला असून ...

विंजासन बुद्ध लेणी परिसर होणार सुशोभीत
अनिल धानोरकर : प्रादेशिक पर्यंटन निधीतून होणार विकास
भद्रावती: प्रादेशिक पर्यटन निधीतंर्गत विंजासन बुद्धलेणी परिसरातील विकासात्मक कामाला लागणारा निधी शासनाकडून भद्रावती न.प.ला प्राप्त झाला असून बुद्ध लेणी परिसर सौंदर्यीकरणासाठी विविध कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
यामध्ये विंजासन बुद्धलेणी येथील जोड रस्त्याच्या विकास, बगीचा व विकासात्मक कामे होणार आहेत. बुद्ध लेणीला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे बालोज्ञान व बगीचा तयार करणे, पथदिवे तसेच प्लेवर ब्लॉक्स मैदान समांतर करुन र्पाकिंगची व्यवस्था करणे, लेब्हाटरी ब्लॉक, किचन शेड तयार करणे यासोबतच शिवरकर सोसायटी मधील पुरातन हनुमान मंदिराची विकासात्मक कामे होणार आहेत. दोन्ही विकासात्मक कामांची किंमत दोन कोटी २५ लाख ८५ हजार ९०० रुपये असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले. यासोबतच नागमंदिर जवळील प्रवेशद्वाराचे डोम व्यवस्थीत करण्यात येणार असून कामाच्या दृष्टीभेटसाठी आॅर्डर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)