हिवाळ्यातले पाहुणे दाखल...
By Admin | Updated: November 21, 2015 00:50 IST2015-11-21T00:50:41+5:302015-11-21T00:50:41+5:30
वाईल्ड कॅप्चर संस्थेद्वारा चंद्रपूर येथील अॅश बंड येथे पक्षी निरीक्षणाकरिता भेट देण्यात आली.

हिवाळ्यातले पाहुणे दाखल...
हिवाळ्यातले पाहुणे दाखल... वाईल्ड कॅप्चर संस्थेद्वारा चंद्रपूर येथील अॅश बंड येथे पक्षी निरीक्षणाकरिता भेट देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या परिसरात मोठ्या संख्येने हिवाळी स्थलांतरित पक्षी आढळून आले. हा परिसर विदेशी पक्ष्यांकरिता अतिशय पाणस्थळ म्हणून ओळखला जातो. यावर्षी येथे ब्राह्मणी शेल डक, ब्लॅक हेडेड गल, युरेशियन स्पून बील, ग्रे वॅगटेल, व्हाईट वॅगटेल, सरटाईन वॅगटेल, नॉर्दन शावेलर, नॉर्दन पीन टेल, स्पॉट बील डक, पेन्टेड स्टॉर्क अशा अनेक सुंदर पक्ष्यांचे आगमन या ठिकाणी झालेले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रोहित सिंह ठाकुर, सचिव प्रवीण निखारे, नितीन हेजीब, योगेश पेन्टेवार, नितीन मत्ते, आशिष व्यास यांनी या दुर्लभ पक्ष्यांचे निरीक्षण केले व नोंदी घेतल्या.