वादळी पावसाने २५ एकरातील केळीची बाग नष्ट

By Admin | Updated: March 16, 2017 00:38 IST2017-03-16T00:38:42+5:302017-03-16T00:38:42+5:30

मागील ६० वर्षांपासून सास्ती रामनगर शिवारात राहणाऱ्या राजकुमार निषाद या शेतकऱ्याच्या कुटुंबावर निसर्गाच्या अवकृपेमुळे संकट कोसळले आहे.

Windy rain destroyed 25 acres of banana garden | वादळी पावसाने २५ एकरातील केळीची बाग नष्ट

वादळी पावसाने २५ एकरातील केळीची बाग नष्ट

२० लाखांचे नुकसान : शेतकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक
बी.यू. बोर्डेवार राजुरा
मागील ६० वर्षांपासून सास्ती रामनगर शिवारात राहणाऱ्या राजकुमार निषाद या शेतकऱ्याच्या कुटुंबावर निसर्गाच्या अवकृपेमुळे संकट कोसळले आहे. वादळी गारपिटीमुळे त्यांचे २५ एकरातील उभे पीक नष्ट झाले. त्यामुळे जवळपास २० लाखांचे नुकसान झाले असून मदतीसाठी त्यांची आर्त हाक सुरू आहे.
अचानक आलेल्या वादळी गारपिटीमुळे राजकुमार निषाद याची केळीची बाग पूर्ण जमीनदोस्त झाली. या बागेच्या बाजूला असलेल्या तलावात २० हजार मच्छीबीज होते. मात्र बर्फाच्या गारठ्यामुळे पूर्ण मासोळ्या मरण पावल्या. यात चार ते सात किलो वजनाच्या मासोळ्यांचा समावेश आहे. शेतामध्ये तोडणीला आलेले हरभरा, मिरची, ज्वारीचे पीक पूर्णत: नष्ट झाले. यामुळे त्यांचे २० लाखांचे नुकसान झाले.
याच ठिकाणी गंगाबाई निषाद या वादळी गापपिटीच्या पावसात सापडल्या. यात त्यांच्या पाच बकऱ्यांचा गारामुळे मृत्यू झाला. तर दोन बकऱ्या लंगड्या झाल्या. शेतामध्ये असलेली पाईप लाईन गारांमुळे फुटून गेली. या गारामुळे शेकडो पक्षी मरण पावले. एक तास मोठमोठ्या गारांचा सडा पडला. संपूर्ण परिसर काश्मीर झाल्याचे चित्र शेतामध्ये दिसत होते.
ऐन होळी सणाच्या पूर्वसंध्येला गारपीट व वादळी पाऊस झाल्याने २५ एकरातील केळीची बाग उद्धवस्त झाली. यात त्यांचे २० लाखांचे नुकसान झाले असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अ‍ॅड.संजय धोेटे यांनी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी शेतकऱ्याची मागणी आहे.

३५ जणांचे संयुक्त कुटुंब
राजकुमार निषाद या शेतकऱ्याने समाजाला संयुक्त कुटुंब प्रणालीचे एक चांगले उदाहरण दिले आहे. सात भाऊ, चार बहिणी, त्याचे मुल, जावई, नातू, नातीन असा ३५ व्यक्तींचा परिवार एकाच ठिकाणी वास्तव्यास असून सर्वांचे जेवण सकाळ, संध्याकाळ एकत्र तयार होते. मात्र या संयुक्त कुटुंबावर निर्सगाच्या अवकृपेने मोठे संकट ओढावले आहे.

Web Title: Windy rain destroyed 25 acres of banana garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.