बाबांसारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात, नको रे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST2021-05-19T04:29:37+5:302021-05-19T04:29:37+5:30
दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्यातुलनेत आपली आरोग्य व्यवस्था व पोलीस व्यवस्था तोकडी पडत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या ...

बाबांसारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात, नको रे बाबा
दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्यातुलनेत आपली आरोग्य व्यवस्था व पोलीस व्यवस्था तोकडी पडत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात पोलीस व डॉक्टरांना अहोरात्र काम करावे लागत आहे. या काळात त्यांच्या कामाचे तासदेखील वाढविण्यात आले आहे. सतत कामात असल्याने तसेच कोरोनाची दहशत असल्याने मुलाबाळांना वेळ देणे शक्य नाही. बऱ्याचदा जेवणावरील ताटावरूनही उटून जात असल्याने त्याचा परिणाम मुलाबाळांवर होत आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिला तर भविष्यात काहींच्या मुलांनी डॉक्टर व पोलीस होण्यास नकार दिला आहे, तर काहींनी आपले वडील लोकांसाठी रात्रंदिवस काम करत असल्याने डॉक्टर व पोलीस होऊन लोकांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बॉक्स
माझे वडील नेहमीच घराबाहेर असतात. घरी येतील कधी आणि जातील कधी याचा नेम नाही. कोरोनापासून तर ते रात्री केव्हा येतात, हे कळतच नाही. त्यामुळे मला पोलीस न बनता मोठा व्यावसायिक बनायचे आहे.
अद्वैत कापडे, चंद्रपूर
-----
माझे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून ते रुग्णसेवा करीत आहेत. याचा मला अभिमान आहे. मीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.
दीक्षांत भास्कर सोनारकर