विजेबाबत मोठे आंदोलन करणार - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:51 IST2021-03-13T04:51:54+5:302021-03-13T04:51:54+5:30

मूल : ठाकरे सरकार हे लबाड सरकार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती देतात आणि शेवटच्या ...

Will make a big agitation about electricity - Devendra Fadnavis | विजेबाबत मोठे आंदोलन करणार - देवेंद्र फडणवीस

विजेबाबत मोठे आंदोलन करणार - देवेंद्र फडणवीस

मूल : ठाकरे सरकार हे लबाड सरकार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती देतात आणि शेवटच्या दिवशी परत वीज कापणी सुरू करतात. शेतकरी, गरीब, कष्टकरी लोकांच्या विरोधातले हे सरकार आहे. विजेबाबत आम्ही मोठे आंदोलन करू, असा इशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मूल येथे आले असता ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हे व्यक्तव्य केले. या वेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त आपल्या मूळ गावी मूल ये​थे आले होते. लहानपणी मूल येथील मंदिरात पूजा करायचे. आज ती संधी प्राप्त झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Will make a big agitation about electricity - Devendra Fadnavis