शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घ काळाची खानपानाची व्यवस्था करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील ज्या आस्थापनावरील कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून काम करत आहेत. त्यांना त्या आस्थापनांची ओळखपत्र देण्यात यावेत. दर्शनी भागात आपले ओळखपत्र घेऊन पोलिसांना दाखवावे. पोलीस विनाकारण कोणावर कारवाई करणार नाही. आतापर्यंत ३९ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : अनावश्यक फिरणाऱ्या ३९ लोकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्वांनी घरीच रहावे म्हणून प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि, १४ एप्रिल व त्यानंतरही गरज पडल्यास दीर्घ काळाच्या खानपान व्यवस्थेसाठी प्रशासन प्रयत्नरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली अन्नधान्य, इंधनाबाबत साठा व वितरण विषयक बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहिते, सहाय्यक जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एन. बी. निंबाळकर तसेच जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनेचे अधिकारी, मेडिकल असोशिएशन, पेट्रोल वितरक, ऑईल व गॅस कंपनीचे प्रतिनिधी, किराणा असोशिएशन, हॉटेलचे मालक प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्यातील ज्या आस्थापनावरील कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून काम करत आहेत. त्यांना त्या आस्थापनांची ओळखपत्र देण्यात यावेत. दर्शनी भागात आपले ओळखपत्र घेऊन पोलिसांना दाखवावे. पोलीस विनाकारण कोणावर कारवाई करणार नाही. आतापर्यंत ३९ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी दिलेल्या वेळेनुसार दुकाने उघडा व दुकाने बंद करा.नागरिकांचा परस्परांशी कमीत कमी संबंध येणे. यासाठी आपण हा लॉकडाऊन पाळत असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.जिल्ह्यामध्ये लवकरच शहराच्या मोठया मैदानात भाजीबाजार घेण्याचा विचार सुरू आहे. तसेच नागरिकांना किराणा होम डिलिव्हरी करण्याची यंत्रणा सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.कॉटन जिनिंग व्यवसायालाही आज सूट देण्यात आली आहे. हॉटेलचे किचन सकाळी व रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील. तसेच, सर्व नागरिकांनी आपल्या अगदी जवळच्या दुकानातूनच जीवनावश्यक वस्तूची खरेदी करावी, वस्तू खरेदी करण्यासाठी वाहन वापरता येणार नाही.जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सुधारित आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु पेट्रोलपंप धारकांनी पेट्रोल पंपवर एका वेळेस दोन व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत. तसेच दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राहील, याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचा भंग झाल्यास संबंधित पेट्रोलपंप धारक व ग्राहक यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी निर्देश दिले आहे.खानपानाची दुकाने उघडी राहणारकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू नये, यासाठी हॉटेलमधील जेवणावळी पूर्णपणे बंद केल्या आहेत. परंतु, या हॉटेल्समध्ये किचन सुरू राहील. जेवणाची व्यवस्था राहणार नाही. तसेच खानपानाची दुकाने उघडी राहतील. मात्र रस्त्यावर उभे राहून किंवा त्या ठिकाणी खान-पान करता येणार नाही. पार्सल सुविधा फक्त उपलब्ध राहतील. आपल्या नजीकच्या किराणा दुकानांमध्ये आपल्या नजीकच्या हॉटेलमध्ये पायी जाऊनच आवश्यकतेनुसार व फारच गरज असल्यास वाहनाचा वापर करावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. शक्यतो घरातील एखादाच नागरिक अशा कामांसाठी बाहेर पडल्यास उत्तम राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.५४ जण होम क्वारेंटाईनमध्येदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. होम क्वॉरेन्टाईन करण्यात आलेल्यांची संख्या ५४ आहे. १४ दिवस होम क्वॉरेन्टाईन पूर्ण केलेल्यांची संख्या ५१ आहे. नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी सात नमुने पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी