लसीकरणानंतर ॲन्टिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:17+5:302021-07-20T04:20:17+5:30
कोरोनावर अद्याप कुठलाही उपाय नाही. केवळ लसच कोरोनाविरुद्ध लढण्याचे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक ...

लसीकरणानंतर ॲन्टिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?
कोरोनावर अद्याप कुठलाही उपाय नाही. केवळ लसच कोरोनाविरुद्ध लढण्याचे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. लसीकरणानंतर साधारत: ३० ते ३५ दिवसांत ॲन्टिबॉडीज तयार होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होत असते. त्यामुळे लसीकरणच एकमेव पर्याय आहे. लसीकरणानंतर आपल्या शरीरात ॲन्टिबॉडीज तयार झाल्या की नाही, असा प्रश्न अनेकांना पडत असून बहुतेक जण तपासणीसुद्धा करीत आहेत; परंतु लसीकरणात ॲन्टिबॉडीज तयार होत असल्याने तपासणीची कुठलीही गरज नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
बॉक्स
रोज १५ ते २० तपासण्या
मागील काही महिन्यांत ॲन्टिबॉडीज तपासणी करण्याच्या संख्येत वाढ होत आहे. शहरातील एका लॅबमध्ये दररोज चार ते पाच ॲन्टिबॉडीज तपासणी केल्या जात आहे. मात्र, अशी तपासणी करण्याची काहीही गरज नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
बॉक्स
तरुणांची संख्या अधिक
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ॲन्टिबॉडीज तपासणीसाठी सर्वाधिक तरुण वर्ग पुढे येत आहे. यामध्ये २५ ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अशा तपासणीबाबत विचारणा करण्यात येत असल्याची माहिती आहे. बहुतेक जण केवळ उत्सुकतेपोटी तपासणी करीत असल्याची माहिती आहे.
कोट
तपासणी करण्याची गरज काय?
पहिला डोस घेतल्यानंतरच ॲन्टिबॉडीज तयार होण्यास सुरुवात होत असते. दोन्ही डोस घेतल्याच्या १५ दिवसांनंतर साधारणत: पूर्णता ॲन्टिबॉडीज तयार होत असतात. त्यामुळे दोन्ही डोस घेणे गरजेचे असते. लसीकरण केल्यानंतर ॲन्टिबॉडीज तपासणीची काहीही गरज नाही. लसीकरणानंतर त्या आपोआप तयार होत असतात.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर