शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

‘डेमू’ला विसापूरला थांबवायला हरकत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 5:00 AM

पूर्वी विसापूर येथे तांत्रिक थांबा देण्यात आला होता व येथून थेट तिकीटसुद्धा मिळत होती. कोरोनाचा प्रकोप वाढला, तेव्हा पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून तिकीटघरसुद्धा बंद झाले. आता पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू होत आहे. मात्र विसापूर येथील रेल्वे तिकीट घर व गोंदिया गाडीचा थांबा बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर :  मागील तीन महिन्यांपासून बल्लारशाह ते गोंदिया आणि बल्लारशाह ते वर्धा अशी डेमू व मेमू ट्रेन सुरू झाल्याने ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त व हक्काचे प्रवासाचे  साधन मिळाले आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात आजही  बल्लारशाह- गोंदिया डेमू ट्रेन थांबत नाही व वर्धा मेमूचा तांत्रिक थांबा असूनही ट्रेनचे तिकीट मिळत नसल्याने  त्यांना अजूनही चंद्रपूर किंवा बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड व गैरसोयींमुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रेल्वे थांबा देण्यात यावा, तिकीट घर सुरू करण्यात यावे, तसेच पूर्वी डेमू व मेमू रेल्वेशिवाय जादा पॅसेंजर गाड्या सोडण्यात याव्या, याबाबतचा पाठपुरावा माजी खासदार हंसराज अहिर यांनी करावा, अशी विनंतीपर मागणी भाजपा युवा उपजिल्हाध्यक्ष संदीप पोडे, रेल्वे तिकीट कंत्राटदार चंद्रशेखर गिरडकर यांनी गावकऱ्यांमार्फत त्यांना केली होती. यापैकी डेमू ट्रेनचा थांबा चांदा फोर्टसमोर प्रत्येक लहान खेड्यातील हॉल्ट स्टेशनवर देण्यात आला आहे. फक्त विसापूरलाच सावत्रपणाची वागणूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे.पूर्वी विसापूर येथे तांत्रिक थांबा देण्यात आला होता व येथून थेट तिकीटसुद्धा मिळत होती. कोरोनाचा प्रकोप वाढला, तेव्हा पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून तिकीटघरसुद्धा बंद झाले. आता पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू होत आहे. मात्र विसापूर येथील रेल्वे तिकीट घर व गोंदिया गाडीचा थांबा बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.

पॅसेंजर गाड्या म्हणजे आवडते प्रवास साधन

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पॅसेंजर गाड्या जीवनवाहिनी आहे. स्वस्त आणि सुलभ प्रवास सुविधेमुळे ग्रामीण भागातील बहुतांश प्रवासी यातूनच प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर प्रदीर्घ संघर्षानंतर भारतीय रेल्वेने पॅसेंजर ट्रेन ऐवजी मेमू आणि डेमू गाड्या सुरू केल्या आहेत. डेमू गाडी बल्लारशाह ते गोंदिया आणि मेमू बल्लारशाह ते वर्धा धावत आहेत. यापैकी एक गाडी येथे थांबत नाही तर दुसरीची तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्या सुरू होऊनही त्याचा काहीच फायदा गावकऱ्यांना होत नाही.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरrailwayरेल्वे