शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संवाद कमी झाल्याने पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:55 IST

ताणतणावही कारणीभूत : नैराश्यातून स्वतःला संपविले;

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये विविध घटनेत अनेकांनी नैराश्यातून स्वतःला संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्येत पुरुष असो की महिला या दोघांचेही प्रमाण पाहता यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्येच्या घटना अधिक असल्याचे मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांतून दिसून येते.

जिल्ह्यातील मागील काही वर्षात झालेल्या आत्महत्येच्या घटना पाहता यात तरुण मुला-मुलींनीसुद्धा जीवन संपविल्याचे समोर आले आहे. अभ्यासाचे कारण, शिवाय मार्क कमी पडल्याने तसेच आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्य रागावल्याने, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कमी पडल्याने मुला-मुलींकडून अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. दुसरीकडे घरातील वाद, मतभेद, भांडण, शिवाय शेती, पैसा अशा संपत्तीच्या कारणातून सुद्धा काही जण आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतात. किरकोळ बाबीमुळे शारीरिक व्याधीसह मानसिक आजारांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

कारण काय ?आत्महत्येमागे असणाऱ्या विविध कारणांमध्ये नैराश्य, व्यसनाधीनता, मानसिक आजार, ताणतणाव, आर्थिक विवंचना, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, प्रेम, विरह या प्रमुख कारणांचा समावेश होतो. आत्महत्या ही विविध कारणामुळे घडून येणारी घटना आहे. बऱ्याचशा आत्महत्या नैराश्यामधून घडतात. 

मागील काही वर्षांत वाढल्या आत्महत्या

  • मागील काही वर्षांमध्ये अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसून येते. काही जण व्यवसाय बंद पडल्याने किंवा नोकरी गेल्याने निराश होतात. तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने अनेक जण हताश होतात.
  • या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे, या विवंचनेत काही जण टोकाचे पाऊल उचलतात आणि आपले जीवन संपविण्याचा विचार करतात.

जीवन अनमोल आहेआत्महत्येचा विचार मनात येत असेल तर सर्वप्रथम त्याबाबत कुणाजवळ तरी बोलून दाखवावे. जीवन अनमोल आहे. त्याचा आनंद घ्यावा. जीवनातील समस्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. त्यावर कायमचा उपाय करू नये, समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, गरज असल्यास औषधोपचार घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

आत्महत्या करण्यात पुरुषांचे प्रमाण जास्त ?महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण आत्महत्येच्या बाबतीत जास्त असल्याचे विविध आकडेवारीवरून दिसून येते. पोलिस दलाकडे आत्महत्या किंवा अन्य प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली जाते. ताणतणाव असेल तर यातून मार्ग काढता येते.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्यchandrapur-acचंद्रपूर