भाजीपाला तोलूनमापून घेणाऱ्या ग्राहकांचे पेट्रोलकडे दुर्लक्ष का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:26+5:302021-03-19T04:26:26+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वांचे लक्ष पेट्रोल व डिझेलकडे लागले आहे. ...

भाजीपाला तोलूनमापून घेणाऱ्या ग्राहकांचे पेट्रोलकडे दुर्लक्ष का?
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वांचे लक्ष पेट्रोल व डिझेलकडे लागले आहे. आता पेट्रोल, डिझेलचा थेंब न थेंब किमतीचा झाला आहे. मात्र, पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल टाकताना दुर्लक्ष करणारे ग्राहक भाजीपाला मात्र तोलूनमापून घेतात. त्यातच पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधांबाबत ग्राहक अनभिज्ञ आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर शौचालय, हवा, पाण्याची व्यवस्था नसतानाही मुकाट्याने ग्राहक अन्याय सहन करत आहेत. चंद्रपूर पालिका हद्दीत ०० पंप आहेत. दररोज याठिकाणी जवळपास एक लाख लीटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होेते.
मागील महिनाभरात पेट्रोलचा दर शंभरवर पोहोचला आहे. डिझेलचा दरही ९० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे महागाईत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या प्रत्येक थेंबाकडे आता लक्ष आहे. त्यात मापात पाप करणाऱ्यांची कमी नाही. पैसे मोजूनही आपली फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक ग्राहकाने जागरुक होणे गरजेचे आहे.
बाॅक्
शहरातील पेट्रोल पंप
दररोज विक्री होणारे डिझेल
दररोज विक्री होणारे पेट्रोल
बाॅक्स
अशी घ्यावी काळजी
पट्रोल, डिझेल टाकत असताना ग्राहकांनी मशीनवर झीरो आहे का, ते तपासावे, इंधन भरताना गाडी बंद करावी, जेणेकरून लक्ष विचलित होणार नाही तसेच इंजिन चालू असताना इंधन भरल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.
बाॅक्स
तक्रारींचे प्रमाण कमी
पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल खरेदी करताना शंका असल्यास पेट्रोल पंपावर पाच लीटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते. मात्र, या मापाचा वापर करण्याबाबत ग्राहक उदासीन आहेत. आपण दिलेल्या रकमेनुसार योग्य पेट्रोल, डिझेल मिळावे, ही अपेक्षा ग्राहकाची असते. मात्र, अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकांकडून गर्दीत लवकर पेट्रोल टाकण्याच्या प्रयत्नात झिरो बघण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ग्राहकांनी मशीनवर लक्ष ठेवून पेट्रोल घ्यावे.
कोट
पेट्रोल पंपांची नियमित तपासणी केली जाते. ग्राहकांच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी नाहीत. शहरातील पेट्रोलपंप चालकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात.
निरीक्षक, वैधमापन विभाग, चंद्रपूर