गाईच्या गोऱ्ह्याचे मांस विक्री करताना अटक
By Admin | Updated: June 28, 2015 01:41 IST2015-06-28T01:41:09+5:302015-06-28T01:41:09+5:30
बल्लारपूर पोलिसांनी येथील राजेंद्रप्रसाद वॉर्डातील अब्दुल शाबीर (४२) याला गाईच्या गोऱ्ह्याचे मांस विक्री करताना पकडले.

गाईच्या गोऱ्ह्याचे मांस विक्री करताना अटक
बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी येथील राजेंद्रप्रसाद वॉर्डातील अब्दुल शाबीर (४२) याला गाईच्या गोऱ्ह्याचे मांस विक्री करताना पकडले. त्याच्या घरुन ४५ किलो मांस, कातडे, खूर, कुऱ्हाड, तराजू आणि वजने या वस्तू जप्त करुन त्याला अटक केली.
ही कारवाई शुक्रवारी सकाळच्या सुमारास केली. बल्लारपूरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नरुमणी टांडी न त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक सिंगनजुडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव काळे, सहायक फौजदार नजीर शेख, लक्ष्मण धांडे यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम तसेच प्राण्यांना क्रूर वागविण्याचे अधिनियम या अंतर्गत अब्दुल शाबीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भूजबळ यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. शासनाने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरू असलेले कत्तलखाने बंद झाले. मात्र तरीही गोवंश हत्या सुरूच असल्याचे या कारवाईवरून दिसून आले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)