घरात सगळे सदस्य असताना चक्क तिजोरीसह पळविली २१ लाखांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 20:56 IST2021-12-17T20:55:29+5:302021-12-17T20:56:07+5:30
Chandrapur News चंद्रपूर येथील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी चक्क तिजोरीसह २१ लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

घरात सगळे सदस्य असताना चक्क तिजोरीसह पळविली २१ लाखांची रोकड
चंद्रपूर : येथील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी चक्क तिजोरीसह २१ लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच जण घरी असताना चोरट्यांनी तिजोरी कशी काय पळविली, याबाबत पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
चंद्रपूर येथील व्यावसायिक गिरीश चांडक यांचे रामनगर परिसरातील रहमतनगर मार्गावर स्वमालकीचे घर आहे. शुक्रवारी त्यांचे कुटुंबीय घरीच होते. दुपारच्या सुमारास घरातील सेफ बॉक्स गायब दिसला. याबाबत त्यांनी घरच्यांना विचारपूस केली. तेव्हा आलमारीतील २१ लाखाची रोकडही गायब असल्याचे समोर आले. घरी चोरी झाल्याचे कळताच त्यांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.