शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिथे पसरविली दहशत, तिथेच केला त्याचा ‘गेम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

नकोडा गावचे तत्कालीन उपसरपंच आरिफ हनीफ मोहम्मद यांचा ३ एप्रिल २०१६ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात कादीर शेख याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता.  चार दिवसांपूर्वी  जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर शेख याने  बँक ऑफ इंडिया चौक परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणे सुरू केले होते. दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञात पाच-सहा युवकांनी त्याच परिसरात आलेल्या कादीर शेख याची धारदार शस्त्राने गळ्यावर  सपासप वार करून हत्या केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घूस : हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या एका गुंड प्रवृत्तीला युवकाची त्याच ठिकाणी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.कादीर शेख (२५) रा. घुग्घूस असे मृताचे नाव असून त्याला खून प्रकरणात अटक झाली होती. नुकताच जामिनावर सुटून तो घरी आला होता.  हत्या करणारे पाच-सहा आरोपी असल्याची माहिती आहे. नकोडा गावचे तत्कालीन उपसरपंच आरिफ हनीफ मोहम्मद यांचा ३ एप्रिल २०१६ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात कादीर शेख याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता.  चार दिवसांपूर्वी  जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर शेख याने  बँक ऑफ इंडिया चौक परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणे सुरू केले होते. दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञात पाच-सहा युवकांनी त्याच परिसरात आलेल्या कादीर शेख याची धारदार शस्त्राने गळ्यावर  सपासप वार करून हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. सर्व आरोपी घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. संतप्त लोकांनी घटनास्थळी असलेले चारचाकी वाहन जाळून टाकले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले.  घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनीही घटनस्थळाला भेट दिली व माहिती जाणून घेतली. त्या परिसरातील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दंगा नियंत्रण पथक व पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. २०१६ मध्ये झालेल्या त्या खून प्रकरणाशी हे हत्याकांड जुळले असल्याचे काही नागरिक खासगीत म्हणताना दिसत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस