कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 05:00 IST2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:09+5:30
भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय) अकोलाचे महाप्रबंधकांनी कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ करिता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील धानोरा गावाची निवड केली आहे. यानुसार बाजार समितीने पणन संचालक पुणे यांच्या पत्रान्वये शेतकऱ्यांची नावे नोंदणी सुरू केली. आतापर्यंत ३ हजार ८८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आता संबंधित शेतकरी कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरू होतील, याची वारंवार विचारणा करित आहे.

कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांचा कापूस घरी येत आहे. दसरा कोरडा गेला. दिवाळी तोंडावर आहे. मात्र कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याचा पत्ता नाही, अशी विचारणा कापूस उत्पादक शेतकरी बाजार समित्यांकडे करीत आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र पाठवून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय) अकोलाचे महाप्रबंधकांनी कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ करिता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील धानोरा गावाची निवड केली आहे. यानुसार बाजार समितीने पणन संचालक पुणे यांच्या पत्रान्वये शेतकऱ्यांची नावे नोंदणी सुरू केली. आतापर्यंत ३ हजार ८८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आता संबंधित शेतकरी कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरू होतील, याची वारंवार विचारणा करित आहे.
सध्यास्थितीत कापूस घरी ठेवण्याची शेतकऱ्यांकडे सोय नाही. तसेच दिवाळी तोंडावर आहे. कापूस विकून शेतकरी दिवाळी हा सण साजरा करतात. परंतु कापूस खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे, शेतकऱ्यांची ही व्यथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे यांनी पत्रातून मांडली आहे.