चहासाठी रेल्वे थांबते तेव्हा...

By Admin | Updated: May 8, 2016 00:48 IST2016-05-08T00:48:36+5:302016-05-08T00:48:36+5:30

ताडाळी - घुग्घुस - एसीसी कंपनीकडे खाली वॅगन घेऊन जात असताना स्थानिक पोलीस ठाण्याजवळच्या रेल्वे गेटवर चक्क रेल्वे थांबवून रेल्वे कर्मचारी चहा पित होते.

When the train stops for tea ... | चहासाठी रेल्वे थांबते तेव्हा...

चहासाठी रेल्वे थांबते तेव्हा...

घुग्घुस : ताडाळी - घुग्घुस - एसीसी कंपनीकडे खाली वॅगन घेऊन जात असताना स्थानिक पोलीस ठाण्याजवळच्या रेल्वे गेटवर चक्क रेल्वे थांबवून रेल्वे कर्मचारी चहा पित होते. कर्मचाऱ्यांच्या या प्रतापामुळे गेटवर वाहतुकीची कोंडी झाली. हा संतापजनक प्रकार शनिवारी सकाळी उजेडात आला.
घुग्घुस गावाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसभर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर ताडाळी -घुग्घुस व पुढे एसीसीपर्यत रेल्वे लाईन असून सिमेंटची रेल्वेनेच वाहतूक केली जाते. पोलीस ठाण्यानजिक रेल्वे गेट आहे. दिवसातून अनेकदा रेल्वेतून सिमेंटची वाहतूक होत असते. यादरम्यान गेट बंद असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने वाहनचालक नेहमीच त्रस्त असतात. त्याचा फटका रूग्णवाहिकेलाही अनेकदा बसतो. शाळकरी मुलांना शाळेच्या वेळेवर पोहचता येत नाही. आज शनिवारी सकाळी सात-सव्वासातच्या दरम्यान ताडाळीकडून सुमारे ५०-६० रेल्वे वॅगन घेऊन एसीसी कंपनीत जात असलेल्या रेल्वे गाडी चालकाने पोलीस ठाण्यानजिकच्या रेल्वे गेटवर रेल्वे उभी चहा पिण्यासाठी गेला. या प्रकारामुळे त्या गेटवर बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, वाहनधारकांनी आक्रोश केला. त्यानंतर या चालकाने तिथून रेल्वे पुढे नेली. (वार्ताहर)

Web Title: When the train stops for tea ...