व्हाट्सअपमुळे मिळाली बेपत्ता झालेली मुलगी

By Admin | Updated: May 13, 2016 01:06 IST2016-05-13T01:06:44+5:302016-05-13T01:06:44+5:30

राजुरा शहरातील आंबेडकर वॉर्डातील कृतिका शंकर तामखाने (१०) ही मुलगी अचानक सायंकाळी ६ वाजता गायब झाली.

Whats the missing missing girl? | व्हाट्सअपमुळे मिळाली बेपत्ता झालेली मुलगी

व्हाट्सअपमुळे मिळाली बेपत्ता झालेली मुलगी

लोकमतचेही प्रयत्न : राजुऱ्यावरून गेली बल्लारपूरला
राजुरा : राजुरा शहरातील आंबेडकर वॉर्डातील कृतिका शंकर तामखाने (१०) ही मुलगी अचानक सायंकाळी ६ वाजता गायब झाली. जिकडे तिकडे शोधशोध केली. परंतु मिळाली नाही. याची माहिती शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली आणि लोकमतच्या प्रयत्नामुळे अखेर कृतिकाला आई-वडिलांच्या सुपुर्द करण्यात आले.
कृतिका घरून बेपत्ता झाल्यानंतर काही तास लोटताच व्हाट्सअपवर बल्लारपूर पोलीस ठाण्याचा एक मॅसेज होता की, बल्लारपूर बसस्थानकावर एक दहा वर्षाची मुलगी मिळाली आहे. याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला व्हाटस्अपमुळे मिळाली. त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता त्या मुलीचे नाव प्रिया प्रविण वनकर (१०) रा. आंबेडकर वार्ड, नागपूर असे असल्याचे सांगितले. सदर मुलीने तेच नाव पोलिसांना सांगितले होते. मात्र यात शंका निर्माण झाल्यामुळे बल्लारपूरच्या पोलिसांनी ताबडतोब मुलीचे छायाचित्र लोकमत प्रतिनिधी बी.यू. बोर्डेवार यांच्या व्हाटस्अपवर पाठविले. ते छायाचित्र घेऊन प्रा.बी.यू. बोर्डेवार, बादल बेले, प्रविण देशकर हे सदर मुलीच्या घरी गेले. त्यानंतर बेपत्ता झालेली कृतिका तेच असल्याचे निष्पन्न झाले. आई- वडिलांनी छायाचित्र पाहताच कृतिकाला ओळखले. त्या मुलीचे नाव प्रिया वनकर नसून कृतिका शंकर तामखाने (१०) आहे, हे सिध्द झाले. मात्र मुलीने नाव चुकीचे का सांगितले, याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
मुलगी भेटण्याचा आनंद आई-वडीलांना झाला. लगेच आई- वडिल बल्लारपूर पोलीस स्टेशनला पोहचून आपल्या मुलीला राजुरा येथे घेऊन आले. सोशल मिडियाचा सध्या वाट्टेल तसा वापर सुरू आहे. मात्र याचा चांगला व लोकोपयोगासाठी व जनजागृतीसाठी केला तर त्याचे निश्चित चांगले परिणाम होतात, हे या प्रकारावरून दिसून आले. बल्लारपूर पोलीस आणि लोकमतचे नागरिकांनी कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Whats the missing missing girl?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.