शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जिवावर बेतणारे असे धाडस काय कामाचे?

By admin | Updated: May 31, 2017 01:47 IST

काही अविचारी लोक नको तेथे अवास्तव धाडस करून विनाकारण आपला जीव गमावतात. धावत्या रेल्वेगाडीत,

वसंत खेडेकर। लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : काही अविचारी लोक नको तेथे अवास्तव धाडस करून विनाकारण आपला जीव गमावतात. धावत्या रेल्वेगाडीत, गाडीच्या उघड्या दारावर अगदी काठावर उभे राहून हवेशी बात करणे हे त्यातीलच एक नेहमीचे आपल्या अवती भवती दिसणारे धाडस. या अशा धाडसापायी अनेकांचे जीव गेले व जात आहेत. दोन दिवसापूर्वी, माजरी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर झुडपात एका अनोळखी युवकाचे फुगून असलेले प्रेत आढळून आले. हे रेल्वे स्थानक बल्लारशाह रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येत असल्याने पोलिसांनी त्या प्रेताचा पंचनामा केला. एकंदरीत तेथील स्थिती बघता, हा युवक धावत्या गाडीतून पडून मृत पावला असावा. या निष्कर्षावर पोलीस पोहचले. तो कोण, कुठला हे कळले नाही. रेल्वेने पडून मरण पावल्याच्या घटना होत असतात. याला कारणीभूत बळी पडणारे प्रवाशी व त्यांचा निष्काळजीपणा आणि विनाकारण अंगी आणलेले धाडस हेच असते. डब्यात बसायला भरपूर मोकळी जागा असूनही अतिउत्साही प्रवाशी जाणून दारावर बसतात नुसते बसतच नाही, तर हातवारे-पायवारे करतात. पूर्ण शरीर डब्याबाहेर झोकून देतात. मग, त्यांना रस्त्यात येणाऱ्या सिग्नल खांबांची भिती किंवा अन्य कुणाची भिती वाटत नाही. त्यात थोडक्यात निभावले तर ठीक नाही तर त्याचे वाईट परिणाम होतात हे आपण बघतोच. काही उत्साही बाप आपल्या लहान लेकरांनाही दारावर घेऊन बसतात. याला काय म्हणावे? त्यांना सांगणार कोण? टीसीचा डब्यात फेरफटका असला की, ते त्यांची कानउघडणी करतात. पण, ते तेवढ्यापुरतेच असते. जी गोष्ट रेल्वेची, तीच पण थोड्या फार फरकाने सडक मार्गावरुन धावणाऱ्या आटो व काळ्यापिवळ्या प्रवाशी गाड्यांची! त्या गाड्यांमध्ये बसण्याची असलेल्या क्षमतेच्या तीन चार पटीने प्रवाशी कोंबतात. एवढे की, चालकाच्या दोन्ही बाजूला दोन दोन जणांना बसविले जाते. या प्रकाराने वाहनाच्या चालकाला पुरेसे नियंत्रण करण्याला मोकळिक मिळावी, अशी जागाच मिळत नसल्याने आणिबाणी प्रसंगी वाहन अनियंत्रीत होवून अपघात घडतो. प्रवाशांचे व चालक यांचे जीव जातात. वाहनात किती प्रवाशी बसवावे याचे वाहतूक नियम आहेत, पण ते पाळल्या जात नाही. पोलिसांना हे सर्व दिसत असूनही अर्थकारणामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. तशीच गोष्ट मार्गावर धावणाऱ्या दोन चाकी वाहनांची. स्कुटी वा बाईकवर दोनजण बसण्याचा नियम आहे. मात्र या नियमाला बंगल देत दुचाकी वाहनांवर तीन ते चारजण बसविण्यात येत असतात. साधारणत: नवरा, बायको, दोन वा तीन मुलं व सोबतीला गाडीच्या दोन्ही बाजूंना भल्या मोठ्या वजनी बॅगा! कोंबून बसलेल्या लहान लहान मुलांना सहजपणे श्वासही घेता येऊ नये सा कोंडमारा. अशा अवस्थेत भर उन्हात काही जण ३०-४० किलोमीटरचा प्रवास करतात. सडक अरुंद, खडतर रोड असले की अपघाताची शक्यता अधिक! पण, अति उत्साह, बेफिकीरी, पैसे आणि वेळ वाचविण्याची वृत्ती- त्यातून अघटीत घडले की हानी आपलीच होते, ही बाब असे लोक ध्यानीच घेत नाही. आणखी एक प्रकार नदीच पोहण्याचा. आपण पोहण्यात तरबेज आहोत असे प्रत्येक पोहणाऱ्यांना वाटत असते. त्यामुळे, पाण्यावर आपली हुकूमत आहे अशा आविर्भावात पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरतात दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीच्या बल्लारपूर येथील गणेश विसर्जन घाटावर आंघोळीला पाण्यात उतरलेल्या नागपूरच्या १७ व १९ वर्षीय भावंडांचा बुडून जीव गेला. ते येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नात आले होते. त्यांच्या या निधनाने लग्नघरी शोककळा पसरल्या. अविवेक, अति उत्साह यातून अशा अप्रिय घटना घडतात. ‘हऽऽ, क्या होता है’ अशी दर्पोक्ती व अति आत्मविश्वासातून असे होते. पण, काळ सारखा राहत नाही आदमी को चाहिए वक्त से डरकर रहे, कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज’ असे शाहीर लुधियानवी यांनी लिहून ठेवले, ते उगीच नव्हे! त्यामुळे कुठेही असो, सावधानी बाळगणे हेच उत्तम.