लोकमत न्यूज नेटवर्क भिसी : वॉर्ड क्र .४मध्ये भिसी-वाढोणा रस्त्याच्या बाजूला असलेल्या तणसीच्या ढिगारयांना संध्याकाळच्या सुमारास आग लागून ढिगारे जळूनखाकझाले.आग लवकर आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला, एका रस्त्याने जाणाऱ्या माणसाने बिडीचा तुकडा फेकल्याने व हवा असल्यामुळे नकळत आग लागून तणसीच्या ढिगाऱ्याने पेट घेतला. यामध्ये दासु हिरेकन, बाबा खडसंग यांची तणस जळून खाक झाक झाली. गावातील लोकांच्या सतर्कतेमुळे फार मोठे होणारे नुकसान टळले. जि. प. सदस्य व कांग्रेस गटनेता डॉ .सतिश वारजूकर यांचे टंकरमुळे आग विझवण्यात आली. दोघांचेही पाच-पाच हजाराचे नुकसान झाले.यावेस बाजार समिती पुणेचे संचालक घनश्याम डूकरे", जि.प.सदस्य ममता डूकरे, सरपंच अरविंद रेवतकर, उपसरपंच लिलाधर बन्सोड याँनी घटना स्थळाला भेट दिली. तसेच पिडितांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
भिसी येथे आगीत तणसाचे ढिगारे खाक
By admin | Updated: May 20, 2017 01:22 IST