दर बुधवारी वढोलीत आता आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:40+5:302021-04-02T04:29:40+5:30

वढोलीच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात छोटे खेडे असून वढोलीसह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन बारमाही घेतात. त्या शेतकऱ्यांना भाजीपाला ...

The weekly market now increases every Wednesday | दर बुधवारी वढोलीत आता आठवडी बाजार

दर बुधवारी वढोलीत आता आठवडी बाजार

वढोलीच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात छोटे खेडे असून वढोलीसह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन बारमाही घेतात. त्या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी व ग्राहकांच्या हितासाठी निसर्ग, सक्षम ग्रामसंघ व ग्रामपंचायतच्या पुढाकारातून बुधवारी माता मंदिरच्या मागे बसस्थानकजवळ आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली. गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आठवडी बाजार उत्तम माध्यम असून बचत गट व गावाचा विकास साधता येणार गावाची वेगळी ओळख व महिला सक्षमीकरण होणार, असे प्रतिपादन संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे यांनी केले. सक्षम,निसर्ग ग्रामसंघ याच्या अंतर्गत गावातील ४८ महिला बचत गट कार्यरत असून महिलांना गावात उद्योग निर्माण व्हावा. करिता गावात आठवडी बाजार सुरू करण्यात आला.याप्रसंगी सरपंच राजेश कवठे, विस्तार अधिकारी शिंदे, उपसरपंच देवाडे,तारड्याचे सरपंच तरुण उमरे, ग्रा.प.सदस्य संदीप पौरकार,पाणलोट समिती अध्यक्ष सूरज माडूरवार,शा.व्य.स अध्यक्ष संदीप लाटकर,नलुताई कोहपरे,सुरेंद्र मंडपल्लीवर,मुरली आत्राम,शेंडे,रेखा नामेवार,अंजना झाडे,वैशाली पौरकार,ग्रामसेवक झिले,माया कुलमेथे ,उमेद अभियानाचे गोरघाटे,प्रकाश रामटेके, किशोर हिंगाने, संतोष वाढई आदी उपस्थित होते.

Web Title: The weekly market now increases every Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.