शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

हिरावला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:56 IST

बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला.

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण : ९० टक्के पीक बाधित

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला. एक लाख ८२ हजार हेक्टरवरील कापसापैकी तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टरवरील पीक बोंडअळीने खावून टाकली तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टरवरील धानपिकापैकी एक लाख पाच हजार ५० हेक्टरवरील पीक तुडतुड्याने उद्ध्वस्त केले. अगदी तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऋतुचक्राने आपली नियमितता आणि सातत्य कायम राखले नाही. कोणत्याही ऋतुने आपले गुणधर्म दाखविले नाही. वातावरणाच्या या बदलाचा कृषी क्षेत्राला यंदा चांगलाच फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर धानपीक लावण्यात आले. दोन्ही पिके प्रारंभी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकºयांनी पिकांची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे पिकांची वाढ भराभर झाली. मात्र सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात अचानक कापसावर बोंडअळीने आणि धानावर तपकिरी तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. प्रकोप एवढा मोठा होता की जवळजवळ ९० टक्के लागवड क्षेत्र या रोगामुळे बाधित झाले. तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे तुडतुड्याने एक लाख पाच हजार ५० हेक्टर क्षेत्रावरील धानपिकाची तणस करून टाकली.दीड लाखांवर धान उत्पादकांना फटकाजिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी हा धान पट्टा मानला जातो. या पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने बाधित करून टाकली आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार तब्बल एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना तुडतुड्यामुळे जबर फटका बसला आहे.तीन हजार १३७ कापूस उत्पादकांचे नुकसानजिल्ह्यातील राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, जिवती या तालुक्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या तालुक्यांमधील तब्बल तीन हजार १३७ शेतकºयांच्या पिकांवर बोंडअळीचा प्रकोप सर्व्हेक्षणात दिसून आला.आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आघातबोंडअळी आणि तुडतुडा हे पिकांवरील रोग जिल्ह्यासाठी नवीन नाही. या दोन्ही रोगांचे यापूर्वीही पिकांवर आक्रमण झाले आहे. मात्र यावर्षी तब्बल ९० टक्के कृषी क्षेत्र या रोगांनी व्यापले आहे. मागील दहा वर्षांत या रोगांनी एवढे नुकसान कधीच केले नव्हते. आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा प्रकोप असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.वातावरणातील बदल कारणीभूतबोंडअळी आणि तुडतुडा हे रोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास वातावरणातील बदल कारणीभूत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस नव्हता. कधी उन्हाळ्यासारखे वातावरण होते. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दमट वातावरण तयार झाले होते. हे वातावरण या अळ्यांना पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी बोंडअळी आणि तुडतुड्याने चांगलाच प्रकोप केला आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांचे सर्व्हेक्षण केले आहे. यासबंधीचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.- ए.आर. हसनाबादे,जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी