वेकोलि कामगारांचा मोर्चा
By Admin | Updated: October 8, 2015 00:40 IST2015-10-08T00:40:00+5:302015-10-08T00:40:00+5:30
वेकोलिच्या सर्व ठेकेदारी कामगारांना पावर कमेटीच्या निर्णयानुसार वेतन देण्यात यावे याकरिता बुधवारी वेकोलि इंटक युनियनच्या वतीने वैखिक...

वेकोलि कामगारांचा मोर्चा
घुग्घुस : वेकोलिच्या सर्व ठेकेदारी कामगारांना पावर कमेटीच्या निर्णयानुसार वेतन देण्यात यावे याकरिता बुधवारी वेकोलि इंटक युनियनच्या वतीने वैखिक सन्मानजनक दिवस म्हणून स्थानिक वेकोलि महाव्यवस्थापक कार्यालयावर ठेकेदारी कामगाराचा मोर्चा काढला. यावेळी महाव्यवस्थापक कार्यालयात उपस्थित कार्मिक व्यवस्थापक रेशमलाल मोगरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वणी क्षेत्राचे अध्यक्ष लक्ष्मण सादलवार रामपाल वर्मा, जी. विजय कुमार, सुनिल जावने, श्रीकांत माहुलकर, खुर्शीदभाई अकरम, जुबेर अहमद, रामस्वामी सोदारी, एम. बी. देशमाने, अशोक लोणारे, दिलीप काळबांधे, नरेंद्र कुर्लेवार यांच्या उपस्थितीत शेकडो कामगाराची उपस्थिती होती. (वार्ताहर)