भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर राज्य शासनासह आरोग्य प्रशासन हादरले आहे. दरम्यान, फायर तसेच इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन कामालाही लागले आहे. मात्र चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला झुडपांनी असे वेढले असतानाही येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पोटासाठी
कोरोना संकटामुळे छोट्यामोठ्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जो-तो यातून सावरत आपला व्यवसाय रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काहींनी मूळ व्यवसाय बदलवित दुसरा व्यवसाय करणे सुरु केले आहे. चंद्रपूर येथे मागील दोन दिवसापासून गोंदिया तसेच इतर जिल्ह्यातील काही व्यावसायिक आले असून रस्त्याच्या कडेला बसून ते असे विविध साहित्य विकत आहे.