तेजस्विनी प्रकल्प गुंडाळण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: August 3, 2015 00:47 IST2015-08-03T00:47:52+5:302015-08-03T00:47:52+5:30

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाचा ...

On the way to launch Tejaswini project | तेजस्विनी प्रकल्प गुंडाळण्याच्या मार्गावर

तेजस्विनी प्रकल्प गुंडाळण्याच्या मार्गावर

४० सहयोगिनींवर गंडांतर : शासनाने लक्ष द्यावे
चंद्रपूर : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाचा ‘तेजस्विनी’ प्रकल्प निधीअभावी गुंडाळण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पात काम करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ४० तर विदर्भातील ४०० सहयोगिनींवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे महिलांच्या बचत गटाच्या बळकटीकरणाकरिता तेजस्विनी हा प्रकल्प २००७ या वर्षीपासून राज्यात चालविला जात आहे. आठ वर्षांसाठी हा प्रकल्प होता. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहयोगिनींची ११ महिन्याच्या करारतत्त्वावर नियुक्ती करण्यात आली.
सात वर्षापासून राज्यात १४००, विदर्भात ४०० तर जिल्ह्यात ४० महिला, युवती या प्रकल्पात काम करीत आहे. २०१५ मध्ये प्रकल्पाची मुदत संपल्याने हा प्रकल्पच गुंडाळण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू आहेत. विशेष म्हणजे निधी नसल्याचे कारण महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढे केले आहे.
परंतु, मागील सात वर्षांपासून या प्रकल्पात काम करणाऱ्या सहयोगिनींचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच महिला आर्थिक विकास महामंडळ नवी जाहिरात काढून काही जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे जुन्या सहयोगिनी काढून नव्यांना संधी मिळणार असल्याने सात वर्षांपासून प्रकल्पात काम करणाऱ्या सहयोगिनींमध्ये रोष निर्माण झाला आहे.
यातील अनेक सहयोगिनी विवाहित असून त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, अशा परिस्थितीत त्यांना कामावरुन काढले तर त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जुन्या सहयोगिनींनाच प्रकल्पात सामावून घ्यावे अन्यथा ग्रामीण जीवनोन्नती अभियानात सहयोगिनींची नियुक्ती करुन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सहयोगिनींनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बसस्थानक परिसरात दुर्गंधीचे वातावरण
वरोरा : येथील बसस्थानक तालुक्यातील प्रवाशांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. हे स्थानक सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून स्वच्छतागृहातही घाणीचे साम्राज्य आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वारंवार होत आहे.
या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: On the way to launch Tejaswini project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.