बल्लारशाह वनक्षेत्रात पाण्याचे टँक लावण्याची परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:43+5:302021-03-22T04:25:43+5:30
सेव फॉरेस्ट सेव बहुउद्देशीय संस्थेचे निवेदन बल्लारपूर : उन्हाळ्याचा दिवसात वन क्षेत्रातील वन्यप्राणी पाण्यासाठी भटकतात वनखात्याकडून पाणवठ्याची व्यवस्था असली ...

बल्लारशाह वनक्षेत्रात पाण्याचे टँक लावण्याची परवानगी द्यावी
सेव फॉरेस्ट सेव बहुउद्देशीय संस्थेचे निवेदन
बल्लारपूर : उन्हाळ्याचा दिवसात वन क्षेत्रातील वन्यप्राणी पाण्यासाठी भटकतात वनखात्याकडून पाणवठ्याची व्यवस्था असली तरी पाण्याची कमतरता भासतेच हि समस्या ओळखून बल्लारशाह वनपरिक्षेत्रात पाण्याचे सिमेंट टँक लावण्याची परवानगी देण्याचे निवेदन सेव फॉरेस्ट सेव चंद्रपूर बहुउद्देशीय संस्थेतर्फे बल्लारशाह वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना देण्यात आले आहे.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष संतोषसिंग चव्हाण यांनी सांगितले की बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मानोरा, कारवा, बल्लारशाह, कळमना,उमरी विसापूर बिट व वनपरिक्षेत्रातील इतर पाणवठ्यांवर गर्मीची दाहकता बघून पाण्याची कमतरता होण्याची शक्यता आहे. या पाणवठ्यांवर आमच्या संस्थेतर्फे वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे सिमेंट टँक लावण्याची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सतीश नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.