चंद्रपूरकरांना दररोज पाणी पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:47 IST2018-09-15T22:46:41+5:302018-09-15T22:47:00+5:30
मागील तीन महिन्यांपासून इरई धरणाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मनपा देत आहेत. परंतु आता इरई धरणातील पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना दररोज पाणी द्या, अशा मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

चंद्रपूरकरांना दररोज पाणी पुरवठा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील तीन महिन्यांपासून इरई धरणाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मनपा देत आहेत. परंतु आता इरई धरणातील पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना दररोज पाणी द्या, अशा मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
मागील वर्षीच्या साठ्यापेक्षा यावर्षी इरई धरणात जास्त जलसाठा झाला आहे. परंतु अद्यापही महापालिकेकडून नागरिकांना रोज सुरळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. आणि त्यांच्यावर दोषारोपण होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता धरणावरील फिल्टर पंपमध्ये ३ आणि दाताळा येथे एक असे ४ पंप बसवायचे आहे. हे काम युध्द पातळीवर सुरू आहे. म्हणून आम्ही दररोज पाणी पुरवठा करू शकत नाही, असे सांगण्यात आले. येत्या १० दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करू, असेही सांगण्यात आले. दहा दिवसात चंद्रपूर शहराला नियमित पाणी दिले नाही तर चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढीया, बंडोपंत तातावार व असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल सुरपम, माजी नगरसेविका वंदना भागवत, हरीदास डाखरे, राजेंद्र आत्राम, कुमार स्वामी, पोजलवार आदी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी निवेदन देणाºया शिष्टमंडळाशी चर्चा करून लवकरच चंद्रपूरकरांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले.