पाणीटंचाईचा निधी जिरला इंधन आणि अधिग्रहणात !
By Admin | Updated: January 15, 2015 22:48 IST2015-01-15T22:48:24+5:302015-01-15T22:48:24+5:30
माणिकगड पहाडावरील पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी येणारा नैसर्गीक आपत्ती निधी विहीर अधिग्रहण करण्यात व टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या वाहनाच्या इंधनातच खर्च होत

पाणीटंचाईचा निधी जिरला इंधन आणि अधिग्रहणात !
शंकर चव्हाण/संघरक्षीत तावाडे - जिवती
माणिकगड पहाडावरील पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी येणारा नैसर्गीक आपत्ती निधी विहीर अधिग्रहण करण्यात व टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या वाहनाच्या इंधनातच खर्च होत असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. पाण्यासाठी येणारा निधी हा दुसऱ्याच कामावर खर्च होत असल्याने पहाडावरील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कधी सुटेल? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
गाव खेड्यातील प्रत्येक व्यक्तींला शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये, असे शासनाचे धोरण असले तरी पहाडावरील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कधी-कधी तर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. अनेकांचे पाण्यासाठी भांडण होतात. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी शिवारभर फिरण्याची समस्या मात्र जिवती तालुक्याला कायमची चिटकुन बसली आहे. जवळपास असलेली नदी, नाले, विहीरी, हातपंपातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे उपाययोजना गरजेच्या आहेत.