पाऊचमधील पाणी आरोग्यासाठी घातक
By Admin | Updated: May 22, 2015 01:24 IST2015-05-22T01:24:49+5:302015-05-22T01:24:49+5:30
बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या पाण्याच्या पाऊचवर कुठेही बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद केली जात नाही.

पाऊचमधील पाणी आरोग्यासाठी घातक
चंद्रपूर : बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या पाण्याच्या पाऊचवर कुठेही बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद केली जात नाही. प्लास्टिकमध्ये बंद केलेले पाणी किती दिवस वापरता येते, याचेही निकष नाहीत. त्यामुळे पाऊचमधील पाणी मानवी आरोग्यासाठी धोक्याचे ठरत आहे.
उन्हाची तीव्रता वाढली की पाणीटंचाईला सुरूवात होते. स्वच्छ पाण्याची उपलब्धता होत नसल्याने उन्हाळ्यात बाहेर फिरायला निघाल्यानंतर पाणी विकत घेऊन पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. यात मिनरल वॉटर, ड्रिकींग वॉटर या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या या बाटलीबंद पाण्याची मोठयÞा प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा पैसा करण्याचा व्यवसाय चांगलाच वाढीस लागल्याचेही दिसून येत आहे.
एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत १५ ते २० रु पये आहे. गत काही दिवसांत शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्यांनीही बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. यावरून भारतात पाणीही विकले जाते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज ओळखून लहान-मोठयÞा कंपन्या बाटलीबंद पाणी विकत असल्याचे दिसते. शहरात अनेक ठिकाणी पाणपोई असतानाही दुकानातून मिनरल वॉटरची विक्र ी होत आहे. प्रवाशीही आता बसस्थानकावर पाणपोईपेक्षा आरोग्याकरिता २० रुपयांची बॉटल विकत घेऊन आपली तहान भागविताना दिसतात; पण हे पाणी आरोग्याकरिता किती योग्य आहे, याची शहानिशा कुणीही करीत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)