वरोऱ्यात अनेकांच्या घरात पाणी

By Admin | Updated: July 27, 2016 01:13 IST2016-07-27T01:13:51+5:302016-07-27T01:13:51+5:30

मंगळवारी येथे झालेल्या संततधार पावसामुळे राजीव गांधी वॉर्ड, कॉलरी वॉर्ड, मालविय वॉर्डातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले.

Water in many houses in Verhoria | वरोऱ्यात अनेकांच्या घरात पाणी

वरोऱ्यात अनेकांच्या घरात पाणी

मुसळधार पाऊस : अन्न, धान्य भिजले, अनेकजण बेघर
वरोरा : मंगळवारी येथे झालेल्या संततधार पावसामुळे राजीव गांधी वॉर्ड, कॉलरी वॉर्ड, मालविय वॉर्डातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. यात दैनंदिन उपयोगाच्या वस्तूही पाण्याने भिजल्या असून जनजीवन विस्कळीत झाले होते.
मंगळवारी दुपारी वरोरा शहरात संततधार पाऊस झाला. त्यामुळे शाळेकरी मुलांचा रहिदारीचा मुख्य मार्ग असलेला बोर्डा गावात जाणारा बोर्डा रेल्वे पूल, आनंदवन भागातील नागरिकांच्या रहदारीकरीता असणारा रेल्वेस्टेशन जवळील पूलावर पाणी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना, नागरिकांना कसरत करावी लागली. तर काहींनी जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळावरुन जावून पूल पार केला.
राजीव गांधी वॉर्ड, कॉलरी वॉर्ड तसेच मालविय वॉर्डातील शेकडो घरात पावसाचे पाणी शिरले असून त्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक साहित्य भिजले आहे. तर काही साहित्य पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Water in many houses in Verhoria