गोविंदपूर मामा तलावाचे पाणी उन्हाळी धान पिकाला द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:03+5:302020-12-28T04:15:03+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकासाठी गावातील मामा तलावाचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी ...

गोविंदपूर मामा तलावाचे पाणी उन्हाळी धान पिकाला द्यावे
सावरगाव : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकासाठी गावातील मामा तलावाचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
खरीप हंगामात धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे धानाची उतरी घटली. पुर्वी ज्या एका एकरमध्ये २५ ते ३० पोते व्हायचे. तेथे केवळ पाच ते सहा पोते धान होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा लावलेला पैसा निघत नसल्याने कर्जाचे डोंगर वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी गावातीलच मामा तलावाचा पर्याय शोधला आहे. यावर्षी मामा तलावात भरपूर पाणी आहे. तलाव जवळपास ८० टक्के पाणी उपलब्ध आहे. या पाण्याच्या भरोशावर काही एकरापर्यंत रब्बी (उन्हाळी)धान पीक निघू शकते. त्यामुळे मामा तलावाचे पाणी रब्बी पीकांसाठी द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी घोडाझरीचे उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.