मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय

By Admin | Updated: May 5, 2017 01:00 IST2017-05-05T01:00:36+5:302017-05-05T01:00:36+5:30

स्थानिक एकोरी वॉर्ड येथील काँग्रेस सेवादल भवन समोर शहर काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक गोपी रामदास आक्केवार यांनी

Water Facility for Pied Animals | मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय

मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय

चंद्रपूर : स्थानिक एकोरी वॉर्ड येथील काँग्रेस सेवादल भवन समोर शहर काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक गोपी रामदास आक्केवार यांनी मुक्या प्राण्यांच्या पे्रमापोटी तसेच भूतदया दाखवित मुक्या प्राण्यांकरिता स्वखर्चातून पाणपोई उभारली आहे. या कार्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब हातभार लावत आहेत.
या पानपोई उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा मुख्य संघटक अशोक आक्केवार होते. यावेळी उद्घाटक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैदळकर, प्रमुख पाहुणे प्रमोद आक्केवार, सचिन बरबटकर, गंगाधर गुरनुले, विनोद करमरकर, संजय जंपलवार, किशोर जंपलवार, गौरव आक्केवार, मनोज ताठे, अमोल कांबळे, चंदन रामटेके, सुशील आक्केवार, संजय चांदेकर, स्वप्निल सूत्रपवार, नितीन बुरडकर, खंगार, रवी बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक आक्केवार म्हणाले की, उन्हाळ्याचे दिवस मुक्या जनावराकरिता फारच कठीण असतात. माणसाला तहान लागते. त्याप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही तहान लागते. परंतु त्याना पाणी मागता येत नाही. मनुष्याकरिता पाणपोई उभारताना पाहिले आहे. परंतु मुक्या जनावारांसाठी फारच थोडे कार्य करतात. आपणही मुक्या प्रमाण्यावर भुतदया दाखवून आपल्या घराबाहेर पाण्याच्या दोन बादल्या भरुन ठेवाव्यात.
सामूहिकरित्या किंवा वैयक्तिक पातळीवर मुक्या प्राण्याची पाणपोई उभारण्याची संकल्प करु या, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक पशुप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Water Facility for Pied Animals