जलचेतना व प्लास्टिक विरोधी जनजागरण यात्रा

By Admin | Updated: September 20, 2014 23:47 IST2014-09-20T23:47:24+5:302014-09-20T23:47:24+5:30

येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालयातील जिओग्राफर्स एनवारमेंटल आॅर्गनाइजेशन, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, लोकसंंख्या शिक्षण मंडळ व महिला

Water Conscious & Plastic Anti-Janjana Tour | जलचेतना व प्लास्टिक विरोधी जनजागरण यात्रा

जलचेतना व प्लास्टिक विरोधी जनजागरण यात्रा

चंद्रपूर : येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालयातील जिओग्राफर्स एनवारमेंटल आॅर्गनाइजेशन, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, लोकसंंख्या शिक्षण मंडळ व महिला समूह इत्यादी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जल संरक्षण अभियानांतर्गत शनिवारी सकाळी ८.३० वाजता जल चेतना आणि प्लास्टिक पिशवी विरोधी अभियान जनजागरण यात्रा चंद्रपुरात काढण्यात आली.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी जनजागरण यात्रेला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. याप्रसंगी जलबिरादरीचे अध्यक्ष नगरसेवक संजय वैद्य, पर्यावरण तज्ञ प्रा. सुरेश चोपणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर समारो कार्यक्रम झरपट नदी स्वच्छता अभियानाचे प्रणेते तथा पत्रकार मुरलीमनोहर व्यास यांच्या उद्बोधनाने, प्राचार्य डॉ.एम.सुभाष यांच्या प्रमुख उपगस्थितीत पार पडला.
याप्रसंगी मुरली मनोहर व्यास म्हणाले, चंद्रपूर शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले तर समस्या सुटेल. सर्व संकल्प करु या की, माझ्या घरी मी, छतावरील पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबविन. वाहनांचा उपयोग कमीत कमी करुन अधिकाधिक कामे सायकलद्वारे करीन, यापुढे वायू प्रदूषण, ध्वनीप्रदूषण होणार नाही, पेट्रोलची बचत होईल, पर्यायाने पैसा वाचेल, लग्न सभारंभामध्ये डी.जे. वाजवून ध्वनी प्रदूषण करणार नाही तसेच सामान आणण्यासाठी प्लॅस्टीक पिशवी न वापरता कापडाच्या थैली वापरणार अशी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.
संजय वैद्य यांनी, दिवसेंविस जमिनीवरील पाण्याची पातळी कमी होत असून लाखो लिटर पावसाने पााणी व्यर्थ वाहून जात आहे. त्यासाठी जलसंवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या जलचेतना जनजागरण यात्रेमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा महाविद्यालयातील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होऊन जनजागरण केले. जटपुरा गेटवरील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन रामनगर मार्गे शहरातील मुख्य मार्गाने रॅली फिरविण्यात आली. त्यानंतर परत महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.पर्यावरण तज्ञ्ज डॉ. वाय. वाय. दुधपचारे यांंनी रॅलीचे संचालन केले.
या जनजागरण यात्रेमध्ये उपप्राचार्य डॉ. जुगलकिशोर सोमाणी, डॉ. पी.जे. खिंची, प्रा.के.सी. धानोरकर, एन.सी.सी प्रमुख किशोर ठाकरे, एनएसएस प्रमुख प्रा. आय.एस. कोंड्रा, सहप्रमुख डॉ. निलीमा हजारे, लोकसंख्या शिक्षण मंडळाचे प्रमुख डॉ.ए.के. महातळे, महिला समूहाच्या प्रमुख डॉ.अनिता हुडा तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक डी.यू. अडबाले यांच्यासह नागरिकांनी आदींनी सहभाग घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Water Conscious & Plastic Anti-Janjana Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.