शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

असा असायचा बल्लारपुरातील तेंदूपत्ता हंगाम

By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST

जंगल जवळ लागून असलेल्या ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत तेंदूपत्ता तोडणीचे काम सुरू असायचे.

विद्यार्थिदशेतील मुलेही जायची जंगलात : तेंदूपत्ता तोडाईतून जंगल भ्रमंतीचाही आनंदवसंत खेडेकर बल्लारपूरजंगल जवळ लागून असलेल्या ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत तेंदूपत्ता तोडणीचे काम सुरू असायचे. या दिवसात बालपणी अनेकजण गावाला लागून असलेल्या जंगलात भर दुपारी आणि कडक उन्हात तेंदूपत्ता तोडण्याकरिता जात असत. ते दिवस अजूनही चांगले आठवतात. तेंदूपत्ता आणि त्यांच्या मुडक्याला बांधण्याकरिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या वाकाचा विशिष्ट गंध अजुनही चांगला स्मरणात आहे.५५-६० वर्षापूर्वी बल्लारपूर हे फार मोठ गाव नव्हते. पॉवर हाऊस, कोळसा खाण, पेपर मिल, लाकडाचे कोठार आणि मध्यरेल्वेचे शेवटचे आणि महत्वाचे स्टेशन यामुळे औद्योगिकनगर म्हणून या गावाला ओळखले जायचे. बामणी- चंद्रपूर मार्गावर बल्लारपूरच्या हद्दीतील मार्गाच्या एका बाजूला म्हणजे रेल्वे स्टेशन ते पेपर मिल या परिसरात पोस्ट आॅफिस, त्यानंतर लाकडांच्या पसारा आणि झुडपी जंगल तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला राजेंद्र प्राथमिक शाळा, त्यालाच लागून बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, चर्च, पटेल सॉ मिल, दादाभाई पाटरीज, पेपर मिल समोरील रुप महल टॉकीज (आता त्या ठिकाणी प्रिती अ‍ॅन्ड प्रशांत पाईप फॅक्टरी) त्याच्याच बाजूला गुप्ता आणि एका सरदाराचे हॉटेल पुढे आणि वर उल्लेखीत जागांच्या मागे जंगल पसरले होते. नगर परिषद आणि पोलीस ठाणा तोपर्यंत जुन्या वस्ती भागातून स्थानांतरित व्हायचे होते. बल्लारपूरला लागून असलेल्या या जंगलात सर्वच जातीची वृक्षे होती. कुठे घनदाट तर कुठे विरळ जंगल होते. रानडुक्कर, ससे आणि कोल्ह्यांचा तेथे वावर असायचा. या जंगलात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात असे आणि त्याकाळी विडी बनविण्यासाठी या पत्त्याची भरपूर मागणी असायची. तेंदूपत्ता संकलन ठेकेदार, थडी (नदी काठावरील शेत- वावर) किरायाने घेऊन तेथे तेंदूपत्ता संकलित करीत असत. जंगलातून तेंदूपत्ता आणून थडीवर ते विकायला आणणाऱ्यांना बऱ्यांपैकी पैसे मिळत असे. यामुळे घरच्या मोठ्या मंडळीसोबत उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी दशेतील मुलही पानं तोडायला जंगलात जात असत. घरच्यांना थोडी मदत आणि जंगलातत फिरण्याचा आनंद असा दुहेरी उद्देश त्यामागे विद्यार्थ्यांचा असायचा. गावातील बरेचशा घरातून तेंदूपत्ता संकलनाकरिता लोक जायचे. अनेकांची आर्थिक स्थिती बरी नसल्याने अनेक महिला जंगलात सकाळीच सूर्य उगविण्यापूर्वी तेंदूपत्ता तोडण्याकरिता जात असे. अधून-मधून लहान मुलेही हट्ट करुन महिलांसोबत जंगलात म्हणजे दादाभाई पाटरीजचे मागे जात असत. सोबत वाळलेल्या लांब दुधी भोपळ्याच्या आत पाणी भरुन नेत असायचे. याच मोसमात जंगलात टेंभरं आणि खिरण्या लागलेल्या असायच्या. तेंदूपत्ता तोडण्याहून ती रानफळं तोडून खाण्यात मुलांना अधिक रस असायचा आणि पाखराने खाऊन अर्धे असलेले टेंभरं आवडीने ते खात असत. त्यात अधिक गोडवा वाटायचा. जंगलात फिरता-फिरता दादाभाई पाटरीज ते रुपमहल टॉकीजच्या मागेपर्यंत कसे यायचे, हे कळतच नसे. अशी झपाट्याने जंगलात वेळ निघून जायची. महिला उत्साहाने खूप तेंदू पाने तोडायच्या. एवढे की त्याचे दोन मोठे गाठोडे व्हायचे. ते घरी आणल्यानंतर एक एक पत्ता चवळून त्याचे मुडके बांधणे, असे सायंकाळ उशिरापर्यंत चालायचे. मग ते वर्धा नदीच्या काठावरील थडीवर ते विकायला नेत असत. त्याकाळी १०० मुडक्याचे पाच रुपये मिळत असत. किंवा कधी-कधी त्यापेक्षाही कमी पैसे मिळायचे. या पैशांचा घर चालवायला चांगला हातभार लागायचा. तेंदूपत्त्याचा हंगाम सर्वसामान्य घरात एक वेगळेच चैतन्य आणायचा. हाताला काम मिळायचे. पोरांना या निमित्ताने जंगलात भटकायला मिळायचे. आता सारे बदलले. थडीच्या जागांवर मोठाली घरे झालेत. जंगलाच्या ठिकाणी दूरवरपर्यंत लोकवस्ती झाली. जंगल कितीतरी दूर गेले. विडी ओढण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे तेंदूपत्त्याची मागणीदेखील पूर्वी सारखी दिसत नाही.आजही थोडे बहुत लोक तेंदूपत्ता तोडायला जंगलात जाताना दिसतात. परंतु चित्र बदलले आहे. जंगलाला लागून असलेल्या ग्रामीण भागात अजूनही तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात चालत आहे. झाडीपट्टीतील बरेच शेतमजूर या हंगामात तेंदूपत्ता तोडणीकरिता गडचिरोली जिल्ह्यात वा आंध्र प्रदेशातील सीमावर्ती भागात जातात. दीड-दोन महिने तेथे मुक्काम ठोकून चार पैसे गाठीला घेऊन येतात. तेंदूपत्ता संकलनाला आजही महत्व आहेच! थोडा फरक पडला, एवढेच!