गोदाम फुल्ल, धान खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:05+5:302021-01-13T05:14:05+5:30
राजू गेडाम मूल : धानाची आवक वाढल्याने हमीभाव केंद्राचे गोदाम फुल्ल झाले आहे. आता अन्य धान उत्पादक शेतकऱ्यांना गोदाम ...

गोदाम फुल्ल, धान खरेदी बंद
राजू गेडाम
मूल : धानाची आवक वाढल्याने हमीभाव केंद्राचे गोदाम फुल्ल झाले आहे. आता अन्य धान उत्पादक शेतकऱ्यांना गोदाम रिकामी होण्याची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र शासनाने हमीभाव केंद्रात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. आधारभूत केंद्रात धानाची किंमत १८६८ रुपये प्रति क्विंटल मिळणार आहे. शेतकऱ्यांना क्विंटलमागे २,५६८ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हमीभाव केंद्रात धान विक्रीला आणत आहेत. मूल कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आधारभूत केंद्रात नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोदणी सुरू करण्यात आली. यात ११५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र २६५ शेतकऱ्यांचेच ९,७४२.३५ क्विंटल धान खरेदी केल्याचे हमीभाव केंद्राला नंतर दिसून आले. ८८६ शेतकऱ्यांचे धान घरी साठवून आहे. या शेतकऱ्यांना आपले धान विकले जाईल की नाही, याची चिंता लागली आहे.
कोट
आधारभूत केंद्रात धानाची पोती भरली असल्याने धान खरेदी बंद करण्यात आलेली आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. आधारभूत केंद्रातील धानाची पोती नेल्यानंतर धानाची खरेदी केली जाईल.
- चतुर मोहुर्ले, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती मूल.
शेतकऱ्यांना योग्य किमतीसोबतच बोनस मिळणार असल्याने या वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात आधारभूत केंद्रात धान विक्रीसाठी आणत आहेत. ऑनलाईन नोंदणी हमीभाव केंद्र पोत्यांनी भरले असल्याचे कारण देऊन खरेदी बंद केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे धान खरेदी करण्यासंदर्भात तहसीलदार मूल मार्फत मागणी केली आहे.
- विनोद कामडे, शेतकरी तथा नगरसेवक न.प. मूल.