‘त्या’ वॉर्डात गुन्हेगारी वाढली

By Admin | Updated: August 15, 2015 01:28 IST2015-08-15T01:28:55+5:302015-08-15T01:28:55+5:30

स्थानिक शेगाव येथील मठ वॉर्डातील एक भाग अवैध दारू विक्री बेबंदशाही, गुंडागर्दीमुळे अख्या गावात कुप्रसिद्ध झालेल्या ....

The 'ward' increased crime in the ward | ‘त्या’ वॉर्डात गुन्हेगारी वाढली

‘त्या’ वॉर्डात गुन्हेगारी वाढली

नागरिक त्रस्त : अवैध दारूविक्री, जुगार, गुंडागर्दी
शेगाव : स्थानिक शेगाव येथील मठ वॉर्डातील एक भाग अवैध दारू विक्री बेबंदशाही, गुंडागर्दीमुळे अख्या गावात कुप्रसिद्ध झालेल्या मोहल्ल्याचे नवीन नाव गावकऱ्यांनी व पोलिसांनी वरोऱ्याच्या धर्तीवर क्रिमीनल लोकांचा खंजर मोहल्ला असे केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री, जुगार, मच्छिचोरी करणाऱ्या युवकांनी गँगवार तयार करुन सामान्य कमकुवत व्यक्तीवर गुंडागर्दी करणे सुरू केले आहे.
या वॉर्डातील दारूची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना जिवंत मारण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार घडत असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे संभाव्य उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात देशी- विदेशी दारूचा पुरवठा वाढलेला दिसत होता. यातील काही उमेदवार दारू विक्री करणारेच असल्याने त्यांना आदर्श आचार संहितेच्या बडग्यामुळे प्रत्यक्षात दारू विक्री करणे कठीण झाले होते. त्यामुळे बाहेर गावून होणारा दारूचा पुरवठा व विकाऊ वृत्तीच्या मतदारांना निवडणुकीच्या कालखंडात दारू पाजण्याची धुरा याच मोहल्यातील काही गुंड प्रवृत्तीकडे वळलेल्या युवकांवर सोपविली होती. येथील काही युवक चक्क शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने दारूचा सप्लाय ग्राहकापर्यंत करीत आहे. पण ते पोलिसांना दिसत नाही. गावात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, सुखी सधन कुटुंबातील युवक या मार्गी लागले असून प्रतिष्ठेच्या नावाखाली पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकणे सुरू आहे.
दररोज रात्री गावातील चारही बाजूच्या रस्त्यांनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असून ते चिल्लर विक्रेत्यांना गल्लीबोळात विकण्याकरिता देतात. गावात नुकताच प्रसिद्धीझोतात आलेल्या खंजर मोहल्ला (टोपण नाव), जि.प. शाळेजवळ दादापूर रोडने, चंदनखेडा रोडने कन्या शाळा परिसर, नेहरु शाळा परिसर, बसस्टॉप जवळ, बेघरवस्ती, काही पानटपऱ्या, काही किराणेवाले, शेतशिवार परिसर, या ठिकाणी दारूविक्री होते. गावातील स्वत:ला राजकारणी समजणारे स्वयंघोषित नेते, झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गी लागले आहे. रात्री ठोक सप्लाय करणाऱ्या दारू विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात हप्ते मिळत असल्याने पोलीस यंत्रणेला सर्व प्रकारची कल्पना असताना झोपी गेल्याचे ढोंग केले जात असल्याचे चित्र शेगावमध्ये दिसत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: The 'ward' increased crime in the ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.