तेंदूपत्ता मजुरांची ‘भाकरी’च्या शोधात भटकंती

By Admin | Updated: May 27, 2014 00:43 IST2014-05-27T00:43:41+5:302014-05-27T00:43:41+5:30

विदर्भात तेंदूपत्ता संकलन करणार्‍या हजारो मजुरांचे शोषण करुन बिडी कारखानदारांनी मजले चढविले. मात्र रक्ताचे पाणी करणारे मजूर आजही अर्धपोटी जीवन जगत असल्याचे चित्र आहे.

Wandering in search of the Leopard laborers' bread | तेंदूपत्ता मजुरांची ‘भाकरी’च्या शोधात भटकंती

तेंदूपत्ता मजुरांची ‘भाकरी’च्या शोधात भटकंती

राजुरा: विदर्भात तेंदूपत्ता संकलन करणार्‍या हजारो मजुरांचे शोषण करुन बिडी कारखानदारांनी मजले चढविले. मात्र रक्ताचे पाणी करणारे मजूर आजही अर्धपोटी जीवन जगत असल्याचे चित्र आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आणि आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात बिडी बनविण्यासाठी लागणार्‍या तेंदूपत्ता संकलनाचे काम हजारो मजूर करतात. तेंदूपत्ता व्यवसायात उद्योजक कोट्यधीश झाले, तर तेंदू संकलनाचे काम करणारे तेंदूपत्ता मजुर आजही अर्धपोटी राहत आहेत. हा तेंदूपत्ता मजुरांवरील अन्याय असून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकही नेतृत्व पुढे आल्याचे दिसत नाही. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तेंदूपत्ता मजुरांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढा आक्रमक केला, असता त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याची प्रथम जाणीव झाली. वनात राहणारा आदिवासी वन अधिकार्‍याकडून नेहमीच नागवला जात होता. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता ठेकेदारांना वेठीस धरुन आदिवासींना न्याय देण्याचा प्रयत्न करणार्‍या अनेक चळवळी आदिवासीबहुल क्षेत्रात लोकप्रिय झाल्या. आजही बिडी उत्पादन खर्च, कामगारांना मिळणारी मजुरी त्या तुलनेत तेंदूपत्ता गोळा करणार्‍या मजुरांना मिळणारी मजुरी अल्प आहे. तेंदूपत्ता ठेकेदार व बिडी उद्योजक अनेक वर्षापासून तेंदूपानांची खरेदी करीत आहेत. विदर्भाच्या भरोशावर बिडी उद्योग मोठा झाला. परंतु येथील मजुर मात्र कमकुवत झाले. विदर्भात कच्चा माल मिळत असल्यामुळे विदर्भातच बिडी उद्योग सुरु झाल्यास मोठे रोजगाराचे केंद्र बनू शकते. परंतु आजवर असे झाले नाही. तेंदूपानामुळे शासन व ठेकेदाराना मोठा फायदा होत असला तरी मजुरांची अवस्था मात्र दयनिय आहे. नक्षलग्रस्त भागातील तेंदूपत्ता मजुर ‘भाकरी’ च्या शोधात वनवन भटकत असून पूर्ण घटकांची विक्री न झाल्यामुळे शेकडो तेंदूपत्ता संकलन करणार्‍या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेंदूपत्ता घटकाची विक्री न झाल्यामुळे घटक विक्री केलेल्या ठेकेदाराना ५० टक्के तेंदूपत्ता खरेदी करण्याची सवलत जाहीर केली आहे. मागील १० वर्षांत विदर्भातील तेंदूपत्ता घटक खरेदी करणारा ठेकेदार आणि मजुरांचा विचार केल्यास मजुराची आर्थिक स्थिती बदलली नाही. ठेकेदार मात्र कोट्यधिश झाले. अर्धपोटी राहून तेंदूपत्ता संकलन करणार्‍या मजुराच्या नशिबी पूर्ण भाकर केव्हा येईल, याची प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Wandering in search of the Leopard laborers' bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.