बरांज येथील प्रकल्पग्रस्तांची पायी वारी
By Admin | Updated: October 28, 2015 01:16 IST2015-10-28T01:16:33+5:302015-10-28T01:16:33+5:30
तालुक्यातील बरांज स्थित खुल्या कोळसा खाणीच्या चार प्रकल्पग्रस्तांनी भद्रावती ते चंद्रपूर २५ कि.मी. पायीवारी करून केपीसीएल मध्येच कोलवेजसह ...

बरांज येथील प्रकल्पग्रस्तांची पायी वारी
भद्रावती ते चंद्रपूर प्रवास : स्थायी नोकरीची मागणी
भद्रावती : तालुक्यातील बरांज स्थित खुल्या कोळसा खाणीच्या चार प्रकल्पग्रस्तांनी भद्रावती ते चंद्रपूर २५ कि.मी. पायीवारी करून केपीसीएल मध्येच कोलवेजसह स्थायी नोकरी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
पहाटे आठ वाजताच्या सुमारास बरांज गावातून प्रकल्पग्रस्त राजेंद्र डोंगे, दिनेश वानखेडे, रामदास मत्ते, अरविंद देवगडे हे पायी वारी करत दुपारी ३.३० वाजता चंद्रपुरात पोहचले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्यात आले. मागील सहा महिन्यापासून कामगारांना वेतन नाही, खाण बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. येथील खाण कोळसा घोटाळ्यात सापडल्यानंतर केपीसीएल याच कंपनीला ब्लॉक देण्यात आले. त्यामुळे कंपनी जुन्या कामागरांना स्थायी नोकरी देण्यास तयार नाही. कामगारांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनी या खाण प्रकल्पाला देवून आपली उपजिवीका गमावून बसले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कंपनीने स्थायी नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीला धरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)