रवी गीते यांना निरोप

By Admin | Updated: June 19, 2016 00:52 IST2016-06-19T00:52:37+5:302016-06-19T00:52:37+5:30

चंद्रपूर येथील जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांची भंडारा येथे बदली झाली.

Wake up to Ravi Geete | रवी गीते यांना निरोप

रवी गीते यांना निरोप

चंद्रपूर : चंद्रपूर येथील जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांची भंडारा येथे बदली झाली. त्यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यातर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी नव्याने रुजू झालेले जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना रवी गीते म्हणाले, चंद्रपूर येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उत्तम व पारदर्शक काम करता आले. चार वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारची मला अडचण निर्माण झाली नाही. सर्वांनी कार्यालयासाठी चांगल्या प्रकारे काम केल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील रामराव दोडके, तुषार उरकांदे, विजय जाधव, डी.के. इंदूरकर, सुरेंद्र इनवाते, मनोहर बेले, सचिन कोडापे, छायाचित्रकार शशी बाराहाते, गोलू बाराहाते व इतर कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Wake up to Ravi Geete