आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करा

By Admin | Updated: June 24, 2016 01:39 IST2016-06-24T01:39:29+5:302016-06-24T01:39:29+5:30

आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे ध्येयधोरणे, राज ठाकरेंचे विचार घराघरात पोहचवून जनतेच्या मनात आपुलकी निर्माण होईल, असे कार्य करा.

Wake up the administration through the agitations | आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करा

आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करा

हेमंत गडकरी: पक्षकार्यकर्त्यांना दिला संदेश
चंद्रपूर: आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे ध्येयधोरणे, राज ठाकरेंचे विचार घराघरात पोहचवून जनतेच्या मनात आपुलकी निर्माण होईल, असे कार्य करा. चंद्रपुरातील जनतेला मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, साफसफाई व इतर जीवनावश्यक सोईसुविधा मिळाल्याच पाहिजे. याकरिता आंदोलने, निदर्शने, तक्रारी करुन प्रशासनाला जागे करावे, असे निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.
विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत महानगरपालिका निवडणुकीकरिता समन्वय समिती गठीत करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड, राजेंद्र अल्लेवार, विनोद पन्नासे, भरत गुप्ता, सचिन कोतपल्लीवार, महेश वासलवार, महेश शास्त्रकार, मनोज तांबेकर, राजू कुकडे, राहुल बालमवार, मनदीप रोडे, सचिन भोयर, माया मेश्राम, प्रतिमा ठाकूर यांचा समावेश आहे. समिती सदस्यांवर प्रभागामध्ये संघटनात्मक बांधणी, निवडणूक प्रचार यंत्रणा जबाबदारञयजा सोपविल्या आहेत.

Web Title: Wake up the administration through the agitations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.