नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला नियोजन आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:42 IST2017-10-22T23:42:21+5:302017-10-22T23:42:31+5:30
नागभीड-नागपूर या बहुप्रतिक्षित रेल्वे ब्राडगेजच्या कामासाठी लागणाºया निधीचा निम्मा वाटा राज्य सरकारने उचलला असला तरी नियोजन आयोगाच्या मंजुरीनंतरच

नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला नियोजन आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड-नागपूर या बहुप्रतिक्षित रेल्वे ब्राडगेजच्या कामासाठी लागणाºया निधीचा निम्मा वाटा राज्य सरकारने उचलला असला तरी नियोजन आयोगाच्या मंजुरीनंतरच या कामाला गती प्राप्त होणार असल्याचे संकेत शनिवारी येथे मिळाले.
द.पु.म रेल्वेच्या बिलासपूर झोनचे महाप्रबंधक एस.एस.सोईन यांनी शनिवारी नागभीड जंक्शनला भेट दिली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यातून हे संकेत मिळाले. यावेळी सोईन म्हणाले, राज्य सरकार देणार असलेल्या निम्म्या वाट्याची माहिती आम्ही वरिष्ठ पातळीवर कळविली आहे. आता फक्त नियोजन आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. नियोजन आयोगाची मंजुरी मिळाली की नागभीड नागपूर रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला लगेच सुरुवात करण्यात येईल. यावेळी नागपूर मंडळाचे प्रबंधक अमितकुमार अग्रवाल, सुरक्षा कमांडर वाय. के. बालसुब्रमण्यम, नागपूर मंडळ डीआरयुसीसीचे सदस्य संजय गजपुरे उपस्थित होते.
तीन जिल्ह्यांना सोयीचे
या रेल्वेमार्गाची लांबी जवळपास १०६ किमी असून हा रेल्वे मार्ग बनविण्याला ७०८.११ कोटी रु. खर्च येणार आहे. यातील निम्मा खर्च राज्य शासन उचलणार आहे. या खर्चात रेल्वे मार्गासह विद्युतीकरणाचाही अंतर्भाव आहे. हा मार्ग ब्राडगेजमध्ये रुपांतरित झाला तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील नागरिकांना अतिशय सोयीचे होणार आहे.
मध्ये रेल्वेअंतर्गत सुरु असलेले सर्व नॅरोगेज मार्ग यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. मात्र नागभीड - नागपूर हा एकमेव नॅरोगेज मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. नागभीड - नागपूर प्रवास करतो म्हटले तर जवळपास चार तास लागतात. त्यामुळे ब्राडगेजची गरज आहे.