वाघीण, तिच्या बछड्यांचा मोर्चा पिपर्डा गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:15+5:302021-07-07T04:35:15+5:30
पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र पळसगाव परिसरात मागील काही दिवसांपासून वाघीण आणि तिच्या बछड्यांचा ...

वाघीण, तिच्या बछड्यांचा मोर्चा पिपर्डा गावाकडे
पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र पळसगाव परिसरात मागील काही दिवसांपासून वाघीण आणि तिच्या बछड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. आता तीच वाघीण आणि बछड्यांनी आपला मोर्चा पिपर्डा गावाकडे वळविला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, ५ जुलैला वाघिणीने पिपर्डा येथील बैलाला ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पिपर्डा येथील राजेराम पुसाम यांनी आपली बैलजोडी शेतात काम करण्यासाठी नेली होती. दुपारची वेळ असल्यामुळे त्यांनी दोन्ही बैल चरण्यासाठी पाळीला बांधून ठेवले. त्याच वेळी वाघिणीने बैलावर झडप टाकून एका बैलाला ठार केले; तर दुसरा जखमी झाला आहे. या घटनेचा वनपाल किलनाके यांनी पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे. हल्ला केलेल्या वाघिणीने संपूर्ण पळसगाव व परिसरात आपली दहशत निर्माण केली आहे.