शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:17 PM

चिमूर तालुक्यातील मासळ बु. येथून जवळ असलेल्या मानेमोहाळी येथील झित्रुबाई देवस्थानजवळ असलेल्या शेतात शेतकरी सुभाष करारे मोटारपंप बंद करण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला केला. परंतु सुदैवाने या हल्ल्यातून सुभाष करारे थोडक्यात बचावला. त्यानंतर वाघ तिथेच दबा धरून बसला. याची माहिती मिळताच नागरिकांची एकच गर्दी उसळली. अखेर वनविभागाने फटाके फोडून वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले.

ठळक मुद्देथोडक्यात बचावला : वाघाला फटाके फोडून पिटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु : चिमूर तालुक्यातील मासळ बु. येथून जवळ असलेल्या मानेमोहाळी येथील झित्रुबाई देवस्थानजवळ असलेल्या शेतात शेतकरी सुभाष करारे मोटारपंप बंद करण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला केला. परंतु सुदैवाने या हल्ल्यातून सुभाष करारे थोडक्यात बचावला. त्यानंतर वाघ तिथेच दबा धरून बसला. याची माहिती मिळताच नागरिकांची एकच गर्दी उसळली. अखेर वनविभागाने फटाके फोडून वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले.नेरी वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या मानेमोहाळी परिसरातील झित्रुबाई देवस्थानजवळ सुभाष करारे यांचे शेत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात मोटारपंप बंद करण्यासाठी ते गेले असता पट्टेदार वाघाने सुभाष करारे यांच्यावर झडप घेतली. परंतु मधेच काट्याचे झुडूप असल्याने वाघ त्या काटयाच्या झाडाला अडकला. संधी साधत शेतकऱ्याने पळ काढला. त्यामुळे त्याचे प्राण बचावले. त्यानंतर वाघ तिथेच बसला. त्यानंतर आजुबाजुचा गावातील नागरिक व परिसरातील नागरिक पट्टेदार वाघ बघण्यासाठी एकच गर्दी करू लागले. घटनास्थळी जत्रेचे स्वरुप आले होते.नेरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्यासाठी चिमूर पोलिसांना पाचारण करण्यात आले.वाघ अद्यापही तिथेचवाघाला बेशुद्ध करून जंगलात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु वनविभागाने ते काही न ऐकता घटनास्थळावर फटाक्याची आतिषबाजी करुन वाघाला जंगलाच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. वृत्त लिहिपर्यंत वाघ घटनास्थळावरच दबा धरून बसला आहे. वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, चिमूरचे उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, तहसीलदार संजय नागटिळक, जि.प.सदस्य गजानन बुटके, पं. स. उपसभापती शांताराम सेलवटकर,आशिफ शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली.अन् अस्वल जंगलात पळालेपोंभुर्णा : देवाडा खुर्द येथील डोंगर परिसरामधील आंब्याच्या झाडावर अस्वलाने ठिय्या मांडला होता. ही माहिती मिळताच गावकरी व वनविभागाने अस्वलीला जंगलात पळवून लावल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. देवाडा खुर्द हे गाव जंगल परिसराला लागून आहे. येथून अर्ध्या किमी अंतरावरील वनविभागाच्या कक्ष क्र. ६४९ मधील आंब्याच्या झाडावर अस्वलीने ठिय्या मांडला होता. या अस्वलीच्या दर्शन होताच काही नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. त्यांनी ही घटना ग्रामस्थ, वनविभाग व पोलिसांना सांगितली. क्षेत्र सहाय्यक आर. एस. यादव, ठाणेदार एन. जी. कुकडे, पोलिस उपनिरीक्षक मानदकर व ग्रामस्थांनी झाडावर ठाण मांडलेल्या अस्वलीला पळवून लावण्ण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान नागरिकांना माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी उसळली. शर्तीचे प्रयत्न करून या अस्वलीला जंगलात पळविल्याने गावकºयांनी सुटकेचा श्वास टाकला.