वाघ आला रे आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:18+5:302021-02-05T07:33:18+5:30

शंकरपूर : मंगळवारी रात्री नऊ वाजताची वेळ, धावत धावत धापा टाकत एक जण ओरडत आला ‘वाघ आला, वाघ आला’. ...

Wagh aala re aala ... | वाघ आला रे आला...

वाघ आला रे आला...

शंकरपूर : मंगळवारी रात्री नऊ वाजताची वेळ, धावत धावत धापा टाकत एक जण ओरडत आला ‘वाघ आला, वाघ आला’. सर्व लोक त्या दिशेने धावत सुटले. एकच कल्लोळ झाला. वाघ पाहण्यासाठी शेकडो लोक जमा झाले. डरकाळीचा आवाज येत होता; पण वाघ काही दिसत नव्हता. सर्वजण आवाजाच्या दिशेने गेले. मात्र तिथे वाघ नसून एका शेतकऱ्याने पिकाच्या संरक्षणासाठी वाघाची डरकाळी असलेला आवाज टेप करून तो सुरू केलेला दिसला आणि लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शंकरपूर येथील वाॅर्ड नंबर ३ चे रहिवासी असलेले सहारे यांची गाय हरवली. त्याच्यामुळे ते गायीला शोधण्यासाठी जंगलालगत गेले होते. हिरापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. गावालगतच असल्यामुळे तिथे आपल्या गाईची शिकार वाघाने केली असावी, असा त्यांचा अंदाज झाला. धावत धावत ते शंकरपूर बसस्थानक परिसरात आले आणि वाघ आला वाघ आला असे ओरडणे सुरू केले. त्यांच्या या ओरडण्याने ६०-७० लोक जमा झाले. सर्वजण आवाजाच्या घटनास्थळी पळाले. वनविभागालाही याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक व तरुण पर्यावरणवादी मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. डरकाळीचा आवाज सुरूच होता. कोणी त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करत नव्हते. अर्धा तास झाला तरी डरकाळीचा आवाज सुरूच होता. त्यामुळे वनविभाग व तरुण पर्यावरणवादी मंडळचे सदस्य आवाजाच्या दिशेने हळूहळू सरकू लागले. त्यांना सौरऊर्जेचा करंट लावलेला तार दिसून आली. डरकाळीचा आवाज सुरूच होता. हळूहळू समोर सरकताना त्यांना एक बॉक्स दिसला. त्या बॉक्सच्या दिशेने गेले असता एका शेतकऱ्याने शेतीच्या रक्षणासाठी लावलेला तो बॉक्स होता. त्या बॉक्समध्ये वाघाच्या डरकाळीचा आवाज टेप करून ठेवला होता.

Web Title: Wagh aala re aala ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.