कामावर नसताना मजुरी दिली

By Admin | Updated: August 9, 2014 23:38 IST2014-08-09T23:38:19+5:302014-08-09T23:38:19+5:30

मूल पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गडसुर्ला ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमी व गडीसूर्ला ते बाबराळा रस्त्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

Wages paid while not at work | कामावर नसताना मजुरी दिली

कामावर नसताना मजुरी दिली

मूल : मूल पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गडसुर्ला ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमी व गडीसूर्ला ते बाबराळा रस्त्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. त्याचे संगोपन करण्यासाठी लावलेल्या मजुरांमध्ये करुमा बालाजी शेंडे ही महिला कामावर नसताना तिला मजुरी देण्यात आल्याचा प्रकार उजेडात आल्याने खळबळ उडाली आली.
याबाबत चौकशी करून संबंधीत रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अतुल रणदिवे व इतर ६९ ग्रामस्थांनी लेखी पत्राद्वारे मूल पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी मूल यांचेकडे केली आहे.
मूल पंचायत समितीअंतर्गत गडीसुर्ला येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र्रामीण रोजगार योजनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. त्याअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी मजुरांची निवड करण्यात आली. मात्र करुणा बालाजी शेंडे ही महिला या कामावरच नसताना रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या संगनमताने १ जानेवारी ते ७ जानेवारी व २३ ते २९ जानेवारीपर्यंत दोनदा प्रत्येकी ९७२ रुपये अशी एकुण एक हजार ९४४ रुपये रक्कम सदर महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. याप्रकरणी रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अतुल रणदिवे व ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात संवर्ग विकास अधिकारी बी.टी. भावाटी यांचेशी संपर्क साधला, असता चौकशी करू, असे सांगितले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wages paid while not at work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.