मनरेगाची शासकीय दरानुसार मजुरी द्या

By Admin | Updated: August 6, 2015 01:59 IST2015-08-06T01:59:22+5:302015-08-06T01:59:22+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मनरेगात काम करणाऱ्या शंभरच्या वर मजुरांना काम करुनही कामाच्या हजेरी बुकातून ...

Wage at MNREGA rate | मनरेगाची शासकीय दरानुसार मजुरी द्या

मनरेगाची शासकीय दरानुसार मजुरी द्या

शिवसेनेची मागणी : आंदोलनाचा इशारा
ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मनरेगात काम करणाऱ्या शंभरच्या वर मजुरांना काम करुनही कामाच्या हजेरी बुकातून मजुरावर राजकीय पक्षाचा चिन्ह लावून हेतूपूरस्पर डावलले. तसेच कित्येकांना शासन स्तरावर मिळणाऱ्या मजुरी दरात दरानुसार मजुरी न काढता आपला मनमानीचा कळस गाठून अल्पदराची मजुरी काढल्याने मनरेगात काम करणाऱ्या मजुरांनी रोष व्यक्त केला आहे. येत्या दोन आठवड्यात मजुरांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
पिंपळगाव (भो.) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मनरेगात केलेल्या भ्रष्टाचारात सहभागी सरपंच, ग्रामसेवक व तांत्रीक सहायकाला बाजूला ठेवून ग्रामरोजगार सेवक व त्याचा सहाय्यक याच्यावर कारवाई करण्यासाठी गट विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांच्या मार्फत शर्तीचे प्रयत्न चालविले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या चर्चेवरुन दिसून येत आहे.
सदर भ्रष्टाचारात सरपंच हेमंत खोब्रागडे, सचिव नानाजी मेश्राम, तांत्रिक सहायक बळीराम मैंद, रोजगार सेवक दिलीप उरकुडे, रोजगार सेवक सहायक तुळशिदास उरकुडे आदींचा समावेश असल्याचा आरोप शिवेसेनेचे तालुका प्रमुख अमृत नखाते यांनी केला आहे. या नियोजनबद्ध मनरेगाच्या कामात लाखो रुपयांचा डल्ला मारून तो आपल्या घशात कसा उतरवायचा, याची रितसर तालीम या भ्रष्टाचाऱ्यांना एका शिकवणी वर्गातून दिली असल्याची चर्चा असून त्या सर्व पैशाची विल्हेवाट ग्रामपंचायत निवडणुकीवर करण्यासाठी नियोजन झाल्याचा आरोपही आहे. दरम्यान, या प्रकरणात कोणाचीही दया केली जाणार नाही, असे उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे यांनी स्पष्ट केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wage at MNREGA rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.