Wacoli's blasting will dispatch many homes | वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना भेगा
वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना भेगा

ठळक मुद्देनागरिकांचे आंदोलन : खाण बंद करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलि माजरीच्या नागलोन-२ खुल्या कोळसा खाणीच्या ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा पडत आहेत. कोळसा उत्पादनाकरिता मातीचे मोठे ढिगारे उभे केल्याने गावात पाणी साठून आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नागरिकांनी खाण बंद पडण्यासाठी आंदोलन सुरू केले.
समस्या दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. पण दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संप्त झाले. खाणीतील ब्लास्टिंगमुळे घरांना धोका आहे. कलावती परचके यांचे घर पडले. फारूक अहमद सिद्दिकी, रमेश केसकर, छोटू कैथल, धनराज केवट, विजय केवट, गरीबदास केवट, अनिता केवट, कुंता सलाम, मारोती मंदिर, रूखमाआत्राम, लीला मेश्राम, ताराबाई मेश्राम, सुरेश केवट मंदा जोगे, निलेश कोटनाके, चंद्रभान जुमानाके, तारा गेडाम, खेमराज आत्राम, बुधाराज केवट, रामकिशोर केसकर, रामा खंडारकर, राममिलन केवट यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत. त्याकरिता माजरीतील दफाई क्रमांक-१, टेकडी परिसर व महाजन नगर येथील नागरिंकांना सुरक्षित ठिकाणी पूनर्वसन करावे, अशी मागणी लावून धरली. नागलोन खाणीचे उत्पादन ठप्प असून कोळसा वाहतूक बंद आहे. वेकोलिला लाखोंचा फटका बसत आहे. नागरिकांच्या आंदोलनामुळे वेकोलि अधिकाऱ्यांनी सुरक्षा कर्मचारी व पोलिसांना घटनास्थळी प्रचारण केले आहे. वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक गुप्ता यांनी उपक्षेत्रीय प्रबंधक बी. वाल्मिकी महाप्रबंधक संचालन शर्मा व कार्मिक प्रबंधक थोरात यांना चर्चा करण्याकरिता मुख्यालय कुचना येथे बोलावले.
दरम्यान, गावकऱ्यांनी चर्चा करण्याकरिता आंदोलनस्थळी यावे अशी मागणी केली. रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते ठिय्या मांडून होते.
 

Web Title: Wacoli's blasting will dispatch many homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.