मतदान शांततेत : दिग्गजांचे भाग्य मशीनबंद
By Admin | Updated: October 15, 2014 23:30 IST2014-10-15T23:30:29+5:302014-10-15T23:30:29+5:30
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात काही किरकोळ अपवाद वगळता बुधवारी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून झालेल्या मतदानाची सरासरी

मतदान शांततेत : दिग्गजांचे भाग्य मशीनबंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात काही किरकोळ अपवाद वगळता बुधवारी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी ६७ टक्के आहे. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी या मतदार संघात तर सर्वात कमी मतदान चिमूर या मतदार संघात पार पडले. जिल्ह्यात मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भाग्य आज सायंकाळी मशिनबंद झाले. मतदानानंतर आता निवडूण कोण येणार यावर जिल्हाभर चर्चा रंगत आहेत. ही उत्सुकता १९ आॅक्टोबरला निकालानंतर शमणार आहे. जिल्ह्यात सर्व ठिकाणी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. सुरूवातीला धिम्या गतीने सुरू असलेले मतदान दुपारी ३ वाजतानंतर वेगाने पुढे सरकायला लागले. काही मतदान केद्रांवर सायंकाळी रांगा लागल्या होत्या.
चंद्रपूर विधानसभा मतदान केंद्रावरील ३४४ मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रियेला शांततेत सुरूवात झाली. सकाळी ९ वाजता या विधानसभा मतदार संघात फक्त ५.७३ टक्के मतदान झाले होते. दुपारी ११ वाजताच्या फेरीनंतर मतदानाने वेग घेतला. दुपारी चंद्रपुरातील राजीव गांधी महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ८४ वरील मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान अर्धा तास खोळंंबले होते. त्यानंतर ते पूर्ववत सुरू झाले. शहरात एका पक्षाच्या उमेदवाराला रक्कम वाटताना पकडल्याच्या अफवेने काही काळ वातावरण गरम झाले होते. मात्र ती अफवा असल्याचे लक्षात आल्यावर वातावरण निवळले.
राजुरा विधानसभा मतदार संघात ३५० मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. या मतदार संघात १८ संवेदनशिल मतदान केंद्र होती. या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. महाराष्ट्र-आंध्र सिमेवरील वादग्रस्त १२ गावांतील नागरिकांनीही या मतदानात भाग घेतला. राजुरा शहरातील एका केंद्रावर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. प्रकरण निवळले. तर वढोली येथील मतदान केंद्रावरही कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील ३४० मतदान केंद्रांवर कसलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. चंद्रपूर तालुक्यातील उर्जानगर, आणि दुर्गापुरातील तीन केंद्र संवेदनशिल घोषित केल्याने पोलिसांचा या केंद्रांवर पहारा होता. बल्लारपूर शहरातील १६२ क्रमांकाच्या केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान ठप्प पडले होते. हे यंत्र बदलून देण्यात आल्यावर मतदान पूर्ववत सुरू झाले. दरम्यान पोलिसांच्या भरारी पथकाने पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथे एका वाहनातून ६० हजार ७०० रूपयांची रक्कम जप्त केली. या रकमेचा निवडणुकीशी संबध होता का, हे तपासले जात आहे.
ब्रह्मपुरी विधासभा मतदार संघात मतदानाच्या रात्री घडलेला प्रकार आणि मतदान केंद्रावर रक्कम वाटल्याच्या तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडले. येथील ३१२ मतदान केंद्रांवरील मतदानाची टक्केवारी जिल्ह्यात टक्केवारीपेक्षा अधिक आहे. (उर्वारित पान ४ वर)