मतदान : यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: October 14, 2014 23:15 IST2014-10-14T23:15:18+5:302014-10-14T23:15:18+5:30

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या सहाही विधानसभा क्षेत्रातील पोलींग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाल्या आहेत.

Voting: The machinery is ready | मतदान : यंत्रणा सज्ज

मतदान : यंत्रणा सज्ज

पोलिंग पार्टी दाखल : जिल्ह्यात १७ लाख ५९ हजार १४६ मतदार
चंद्रपूर : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या सहाही विधानसभा क्षेत्रातील पोलींग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाल्या आहेत. बुधवारी १५ आॅक्टोबरला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळात मतदान होणार आहे. मतमोजणी १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून होणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाभर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी सहाही विधानसभा क्षेत्रातील १०७ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील पोलिंग पार्टीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर , चंद्रपूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत ३३६ मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व साहित्य वाटप करण्यात आले. साहित्यासह आज पोलिंग पार्टी आपआपल्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या.
जिल्ह्यात राजुरा विधानसभा मतदार संघात २ लाख ९६ हजार ६६०, चंद्रपूर ३ लाख ५८ हजार २७, बल्लारपूा संघात ३ लाख ७ हजार २६७, ब्रह्मपुरीत २ लाख ५५ हजार ३३६, चिमूर संघात २ लाख ६६२ हजार ७५ व वरोरा मतदार संघात २ लाख ७९ हजार ८३४ असे एकूण १७ लाख ५९ हजार १४६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यातील ७० राजुरा, ७१ चंद्रपूर, ७२- बल्लारपूर, ७३- ब्रह्मपुरी, ७४- चिमूर व ७५- वरोरा या विधानसभा मतदार संघातही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत साहित्य वितरित करुन पोलिंग पार्टी रवाना करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ३५०, चंद्रपूर ३४४, बल्लारपूर ३४०, ब्रह्मपुरी ३१२, चिमूर ३०४ व वरोरा ३११ असे एकूण १ हजार ९६२ मतदान केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आले असून ५ हजार ८८० मतदान अधिकारी आहेत.
निवडणूक कर्तव्यावर ९ हजार ८३४ अधिकारी-कर्मचारी व ४ हजार ५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्वांना टपाली मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. मतदान पथकाच्या वाहतुकीसाठी १८४ एसटी बस, ५० मिनीबस, ४०० जिप व २० ट्रकची व्यवस्था करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या विधानसभा मतदार संघामध्ये १५ पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदार केंद्रावर २ बॅलेट युनिट लागणार आहेत. एकूण ३ हजार २४० बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येत आहे. ३४४ मतदान केंद्रावर हे यंत्र वितरीत करण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Voting: The machinery is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.