सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमिषाची आॅफर !

By Admin | Updated: October 9, 2015 01:48 IST2015-10-09T01:48:15+5:302015-10-09T01:48:15+5:30

नवरात्र, दसरा व दिवाळी सणासाठी विक्रेत्यांकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी व त्यांना भुरळ पाडण्यासाठी ‘आॅफर’ जाहीर करण्यात येते.

Voters are invited to celebrate the festival day! | सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमिषाची आॅफर !

सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमिषाची आॅफर !

राजकुमार चुनारकर खडसंगी
नवरात्र, दसरा व दिवाळी सणासाठी विक्रेत्यांकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी व त्यांना भुरळ पाडण्यासाठी ‘आॅफर’ जाहीर करण्यात येते. त्यामध्ये एखाद्या वस्तूवर १० ते २० टक्के पर्यंत डिस्काऊंट, लक्की ड्रा कुपन, एक पे एक फ्रि, हमखास भेटवस्तू आदी उपाय दुकानदाराकडून करण्यात येतात. अशाच स्वरूपाच्या काही आॅफर नगरपरिषद निवडणुकीसाठी चिमूर शहरातील मतदारांना काही उमेदवाराकडून मिळण्याची शक्यता आतापासूनच देण्याचे उमेदवाराच्या पाठीराख्याकडून बोलून दाखवली जावू लागली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
कोणतीही निवडणूक म्हटले की काही कार्यकर्त्यांसाठी पर्वनीय ठरत असते. तर उमेदवारही मिळेल ती संधी साधुन आपल्या मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ८ आॅक्टोबरला संपली. १४ आॅक्टोबरला घटस्थापना व नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असल्यामुळे या दिवसांपासून प्रचाराला जोर येणार आहे. प्रचार करताना मतदाराला आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी उमेदवाराकडून देवीदर्शन सहलीचे आमीषही महिला मतदारांना दाखवले जाण्याची शक्यता आहे.
येत्या २२ आॅक्टोबरला विजयादशमी या दिवशी सर्वसामान्य पुजा करून आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना देतात. मात्र मतदार या दसऱ्याचे औचित्य साधून मतदाराच्या घरापर्यंत पोहचून आपट्याच्या पानांऐवजी अर्धा एक किलोचा मिठाई पॉकेट किंवा दुसरे काही पोहचवण्याचीही शक्यता
येथील राजकीय वातावरण तापले असून काही मागच्या निवडणुकांच्या अनुभवावरून येथे असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. दसरा सण झाल्यानंतर दहा दिवसांनी दिवाळीचा सण येणार आहे. दिवाळीची तयाारी बहुतेकांच्या घरात दहा पंधरा दिवसांपासूनच सुरू असते. मात्र चिमूर नगर परिषदेसाठी मतदान १ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे दिवाळीत फराळाच्या साहित्याचे एक-दोन हजार रुपयाचे कुपन उमेदवाराकडून देण्याचा प्रयत्नही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, निवडणूक ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर आल्याने आताच दोन्ही सणाच्या खर्चाची चिंता नाही, अशाही प्रतिक्रिया काही नागरिकांकडून येवू लागल्या आहेत.
यावर्षीच्या हंगामात पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यात व तालुक्यात पाऊस पडला नाही आणि पावसाची झड मुद्दामच दिसली नाही. मात्र नगर परिषद निवडणुकामुळे उमेदवारांकडून मतदारावर आॅफरचा पाऊस मात्र नक्कीच पडणार आहे, हे सांगायला कुण्या ज्योतीष्यवाल्या बाबाची गरज नाही, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमीषाची आॅफर येवून मतदारांचे काही प्रमाणात अच्छे दिन येणार आहेत.

Web Title: Voters are invited to celebrate the festival day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.