महाव्यवस्थापकांची रेल्वे स्थानकाला भेट

By Admin | Updated: January 29, 2017 01:04 IST2017-01-29T01:04:44+5:302017-01-29T01:04:44+5:30

मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक जे.के. शर्मा यांनी आज शनिवारी सकाळी बल्लारशाह रेल्वे स्थानकाला भेट

Visit to the General Manager's Railway Station | महाव्यवस्थापकांची रेल्वे स्थानकाला भेट

महाव्यवस्थापकांची रेल्वे स्थानकाला भेट

तक्रारी ऐकल्या : कोच इंडिकेशनचे उद्घाटन
बल्लारपूर : मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक जे.के. शर्मा यांनी आज शनिवारी सकाळी बल्लारशाह रेल्वे स्थानकाला भेट देऊन येथील एकूण व्यवस्थेची पाहणी केली. तदवतच, नव्याने बसविलेल्या काही आधुनिक यंत्रांचे उद्घाटनही त्यांनी केले. त्यांच्यासोबत मध्यरेल्वेचे डी.आर.एम. ब्रजेश कुमार गुप्ता तथा अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शर्मा यांनी येथील यंत्र चलित तिकीट वितरण, स्वच्छता, येथील कर्मचारी व अधिकारी यांच्याबाबत माहिती घेऊन काही सूचनाही केल्या. प्रवाशांच्या खाद्यपदार्थाची श्रेणी कशी आहे, हे अगत्याने जाणून घेतले. तदवतच, येथील काही नागरिकांनी त्यांची भेट घेऊन या स्थानकावर असलेल्या उणिवा त्यांच्यापुढे लिखीत स्वरूपात मांडल्या आणि त्याबाबत थोडी चर्चाही केली. यानंतर, गार्डच्या निवासस्थानावर (रनिंग रूम) जाऊन तेथील नवीन बेड व्यवस्थेचे उद्घाटन केले. शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात श्रीनिवास सुंचूवार, गोपाल खंडेलवाल, अजय दुबे, अशोक डागा, नरेश मुंधडा आदींचा समावेश होता.
महाव्यवस्थापकांच्या आगमना निमित्त बल्लारशाह रेल्वे स्थानक परिसर चकाचक करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Visit to the General Manager's Railway Station